शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

मत्स्यशेतीतून रोजगाराची नवी दालने - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 7:48 PM

सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसोबत शासनाने मत्स्यशेतीबाबत धोरण आखणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे अर्थकारण बदलणा-या मत्स्यशेती व्यवसायाकडे उद्योजक वळत आहे.

मालवण : सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसोबत शासनाने मत्स्यशेतीबाबत धोरण आखणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे अर्थकारण बदलणा-या मत्स्यशेती व्यवसायाकडे उद्योजक वळत आहे. त्यामुळे शासनाने शेती करण्यास उपयुक्त नसलेल्या जमिनी मत्स्यशेतीच्या वापरासाठी आणाव्यात. येथील सिंधुदुर्ग बँकेने मत्स्य उद्योजकांना अर्थसाहाय्य करण्याची चांगली भूमिका घेतली आहे. त्याप्रमाणे शासनानेही धोरण निश्चित केल्यास मत्स्यशेतीतून रोजरागाराची नवी दालने निर्माण होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या शरद पवार यांनी देवली येथील उदय फार्म मत्स्य शेती केंद्राला भेट देत कोळंबी प्रकल्पाचा आढावा घेत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रदेश चिटणीस व्हिक्टर डॉन्टस, नगरसेवक अबिद नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष विश्वास साठे, आगोस्तीन डिसोजा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, विनोद आळवे, बाबू डायस, किरण रावले आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जिल्हा बँकेचे अधिकारी अनिरुद्ध देसाई, लोकेगावकर, दयानंद चव्हाण तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे आहे ते नागपूर येथे हलविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा मत्स्य व्यवसायच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे ते हलवू नये. शिवाय कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ देण्यात यावे अशी मागणी मत्स्य महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आली. याप्रश्नी लोकसभेत अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधू असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. पवारांची बोटिंग सफरपवार यांनी आपल्या नातवांसोबत सोमवारी सकाळी देवबाग येथून बोटीने खाडीपात्रातून बोटिंग सफर केली. त्यानंतर त्यांनी बोटीनेच देवली गाठली. देवली गावात पवार यांचे राष्ट्रवादी तसेच ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोळंबी प्रकल्पाची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी जिल्हा बँक, काँग्रेस तसेच अन्य संस्थाच्यावतीने पवार यांचे स्वागत करण्यात आले. पर्यटन व्यावसायिकांचा सत्कारपर्यटन क्षेत्रात योगदान देणा-या देवबाग, तारकर्ली येथील पर्यटन व्यावसायिकांचा जिल्हा बँकेच्यावतीने शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात राजन कुमठेकर, प्रफुल्ल मांजरेकर, श्रीकृष्ण तळवडेकर, मनोज खोबरेकर, सुरेश नेरूरकर, गणेश मिठबावकर या पर्यटन व्यावसायिकांना सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर कुडाळ येथील विधी महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पवार यांनी सत्कार केला. त्यानंतर पवार यांनी मालवण चिवला बीच येथे जलक्रीडा व्यवसायाचा फित कापून शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी मालवणी मेजवानीचा आस्वाद भाई कासवकर यांच्या निवासस्थानी घेतला.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsindhudurgसिंधुदुर्ग