शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ऊस तोडणी टोळ्याची गरज

By admin | Updated: January 7, 2015 00:37 IST

रोजगाराची संधी : जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ

कणकवली : भात लागवडीकडून पैसे मिळवून देणाऱ्या ऊस लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. जिल्ह्यातील ऊस क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या उसाच्या तोडीसाठी परजिल्ह्यातून टोळ्या आयात केल्या जातात. स्थानिक शेतकऱ्यांना ऊस तोडणीच्या टोळ्या तयार करण्याची संधी असून त्याची आवश्यकताही आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षांत ऊस लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. जिल्ह्यातही ऊस शेती होऊ शकते, हे स्पष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे लक्ष दिले आहे. नगदी पिक असल्याने शेतकरी ऊस शेतीकडे वळत आहेत. १२ ते १४ ऊस तोडणी कामगारांची एक टोळी असते. ही टोळी एकावेळी एका शेतकऱ्याच्या उसाची कापणी करते. कोल्हापुरात अशा शेकडो ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या काम करतात. सध्या बीड येथील मजुरांच्या टोळ्या या क्षेत्रात जास्त कार्यरत आहेत. एकट्या गगनबावडा कारखान्याच्या ऊसतोडीच्या ४६९ टोळ्या काम करतात. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढतेसिंधुदुर्गात ऊस लागवडीचे क्षेत्र गेल्या पाच वर्षांत वेगाने वाढते आहे. जिल्ह्यात सुमारे १ लाख ३० हजार टन ऊस उत्पादन होत असल्याची आकडेवारी आहे. गगनबावडा येथे साखर कारखाना असल्याने वैभववाडी व कणकवली तालुक्यांतील गावांमध्ये ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. या ऊस तोडणीसाठी जिल्ह्याबाहेरील ऊस तोडणी कामगार आणले जातात. कणकवली व वैभववाडी तालुक्यात उसाची गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. ऊस क्षेत्र वाढत असून दिवसेंदिवस ऊस तोडणी कामगारांची गरज निर्माण होत आहे. स्थानिक युवकांना यातून रोजगाराची संधी निर्माण होत आहे. - सतीश सावंत,संचालक, जिल्हा बॅँकटनाला २२४ रूपयेऊस तोडणी कामगारांना टनामागे ऊस तोडणीसाठी मजुरी मिळते. सध्या एका टनाला २२४ रूपये दर मिळतो आहे. शासनाचा १९०.१६ रूपये अधिक अठरा टक्के कमिशन असा हा दर मिळतो. सराव असलेला ऊस तोडणी कामगार एका दिवसांत दोन टन उसही तोडतो. सिंधुदुर्गातील स्थानिक मजूर सुरूवातीला दिवसाला एक टन ऊस तोडू शकेल. त्यानंतर सरावाने तो जास्त ऊस तोडू शकेल, असे मत बावडा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.