राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या गाडीला ओरोस येथे अपघात, तिघे बालबाल बचावले
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 28, 2023 15:04 IST2023-07-28T15:03:59+5:302023-07-28T15:04:52+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या गाडीला ओरोस येथे अपघात, तिघे बालबाल बचावले
सिंधुदुर्ग : अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची कार पलटी होवून अपघात झाला आहे. त्यात त्यांच्यासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना आज, शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडली.
सुद्रिक हे आपल्या सहकाऱ्यांसह ओरोस येथून कणकवलीच्या दिशेने जात होते. यावेळी हॉटेल गंगाई समोर गाडी पलटी होऊन अपघात झाला. यावेळी त्यांच्यासमवेत मधुकर शिर्के आणि अमित गुरव हे कार्यकर्ते होते. मात्र सुदैवाने तिघेही बालबाल बचावले.