शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथीचे संकेत; युतीची गणिते अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 5:52 AM

नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष : शिवसेना, भाजपच्या नेतेमंडळींची राजकीय घडामोडींकडे नजर

महेश सरनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण आगामी काळात पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. गेली २५ वर्षे नारायण राणे या सहा अक्षरांभोवती फिरत असलेली राजकीय नेतेमंडळी राणेंच्या नवीन निर्णयात त्यांना साथ देणार काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणार आहे. पुढील काळात राणे यांनी भाजप प्रवेश केल्यास त्यांचे राजकीय शिलेदार त्यांची कास पकडून भाजपात प्रवेश करतील की आणखी कोणता मार्ग पत्करतील ? याबाबतचे अनेक प्रश्न सध्या विचारले जात असून या सर्वच प्रश्नांची उत्तरे गणेशोत्सवानंतर मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, राणेंनी भाजप प्रवेश केल्यास जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव करून शिवसेनेचे विनायक राऊत पहिल्यांदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. तर त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करून शिवसेनेने जिल्ह्यातील गड पुन्हा मिळविला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे जायंट किलर ठरले. राणेंना हरवून कुडाळ मतदारसंघात ते आमदार झाले. तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांनी निवडणुकीपूर्वी सेनेत प्रवेश करून आमदारकीसह मंत्री होण्याचा मानही मिळविला.

त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील कुडाळ आणि सावंतवाडी या दोन्ही मतदारसंघांवर सेनेचा भगवा फडकला. मात्र, याच दरम्यान, उत्तरेकडील कणकवली मतदारसंघात राणेंचे अस्तित्व कायम राहताना राणेंचे दुसरे सुपुत्र नीतेश राणे मोठ्या मताधिक्याने आमदार झाले.विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नव्याने तयार झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राणेंचा बोलबाला पुन्हा पहायला मिळाला. जिल्ह्यात राणेंविरूद्ध शिवसेना यामधील लढाईत कधी सेनेने तर कधी राणेंनी बाजी मारली. कायमच बॅकफूटवर असणाऱ्या भाजपाने मात्र, नगरपालिका निवडणुकीच्यानिमित्ताने मुसंडी मारायला सुुरुवात केली. यात भाजपाचे वेंगुर्ला नगरपालिकेत नगराध्यक्ष, सावंतवाडी आणि मालवण पालिकेत उपनगराध्यक्ष पदासह नगरसेवक निवडून आले. जिल्हा परिषदेचे काही सदस्य आणि काही पंचायत समित्यांमध्ये सेनेच्या बरोबरीने भाजपानेही चंचूप्रवेश केला.

आता सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणेंच्या स्वाभिमान पक्षाविरोधात सेना-भाजपा युतीच्या माध्यमातून एकत्र होती. त्यामुळे राऊत यांनी दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मानही मिळविला. त्याचबरोबरीने २०१४ पेक्षा २०१९ मध्ये आपल्या मताधिक्यामध्येही वाढ केली. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. नारायण राणे हे कुडाळ-मालवण मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरणार की नाही? ते त्यांचे त्यांनाच माहीत. परंतु ते या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात ? याकडे मात्र, संपूर्ण सर्वांचे लक्ष लागून आहे. राणे हे सध्या भाजपाकडून राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीला केवळ एक वर्ष झाले. त्यातील अजून पाच वर्षे बाकी आहेत.मागील आठवड्यात एका खासगी वाहिनीवर झालेल्या मुलाखती दरम्यान, राणे यांनी आपण भाजपा प्रवेशासाठी इच्छुक असून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सूतोवाच केले होते. आगामी दहा दिवसांत याबाबतचा निर्णय न झाल्यास आपण आपली स्वतंत्र भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. तर गेल्या चार-पाच दिवसांत नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील आपल्या घरच्या मैदानावर मातब्बर सहकाºयांना एकत्र करून आपल्या नवीन निर्णयात आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. सोशल मीडियावर तर काही स्वाभिमानचे पदाधिकारी, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे ठरलंय... म्हणून पोस्टही टाकत आहेत.

एकंदरीत नारायण राणे यांनी ३९ वर्षे शिवसेनेत काम केले. त्यानंतर २00५ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर २0१८ मध्ये त्यांनी काँग्रेसलाही रामराम ठोकून आपल्या स्वतंत्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. पक्ष स्थापनेनंतर काही महिन्यांतच राणे यांनी हा पक्ष तत्कालीन केंद्रातील एनडीएला सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले. पुढील काही महिन्यातच ते भाजपाकडून राज्यसभेवर खासदार झाले आहेत. आता ते काय भूमिका घेतात, हे लवकरच कळेल.

युतीची गणिते अडकलीनारायण राणे यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यासाठी शिवसेनेचा विरोध आहे. तो विरोध पडद्यामागे असला तरी त्याबाबतची वाच्यता अनेकवेळा स्वत: राणे यांनीच बोलून दाखविली आहे.भाजपाला मात्र, राणेंसारखा राज्यातील ज्येष्ठ नेता हवा आहे. तसेच भाजपाची कोकणात असलेली ताकद वाढविण्यासाठी राणेंना पक्षात घेण्यासाठी काही नेतेमंडळी आग्रही आहेत. तर काही भाजप नेत्यांना राणे भविष्यात आपल्याला डोईजड होतील अशी भीती वाटत आहे. त्यामुळे द्विधा अवस्था पहायला मिळत आहे.युतीची गणिते अडकण्यामागे राणे पक्षप्रवेश हेही एक कारण असल्याचे बोलले जात आहे.काही नेते करणारशिवसेनेत पक्षप्रवेशनारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास राणे यांचे विरोधक म्हणून काम केलेले सध्या भाजपामध्ये असलेले काही नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते राणेंच्या निर्णयानंतर आपला निर्णय घेणार आहेत.सगळीकडे एकच चर्चाराज्यातही ठरतेय लक्षवेधीराजकीय वातावरण विधानसभा निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. अगदी छोटासा जिल्हा असूनही राजकीयदृष्ट्या राणेंमुळे हा जिल्हा संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे.

राणेंनी भाजपात प्रवेश केला तर आमदार नीतेश राणे यांना कणकवली मतदार संघातून भाजपाकडून उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेने आता इच्छुक असलेल्या नेत्यांची गोची होणार आहे. एकतर त्यांना अपक्ष किंवा दुसºया पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांत भाजपाकडून इच्छुक असलेल्या नेतेमंडळींनी मोठी साखर पेरणी केली आहे. त्यांचे भवितव्य आता राणेंच्या प्रवेशानंतरच ठरणार आहे.राजकारणात अस्थिरतेचे वातावरणशिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान अशा तीन राजकीय ईनिंगनंतर जर राणेंनी भाजपात प्रवेश केला तर त्यांची भाजपाच्या रुपाने चौथी ईनिंग असणार आहे. त्यामुळे राणे आता काय निर्णय घेतात ? भाजपामध्ये त्यांना प्रवेश मिळतो काय ? राणेंनी प्रवेश केला तर युती टिकेल काय ? आता भाजपामध्ये असणारे जिल्ह्यातील नेते काय करणार ? ते राणेंसमवेत जुळवून घेणार की अन्य कोणत्या पक्षात प्रवेश करणार ? सेनेनंतर भाजपा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष होईल काय ? अशा अनेक प्रश्नांनी जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी गणेशोत्सव संपण्याची वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत मात्र, याबाबतीतील चर्चांना उधाण आले आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Dipak Kesarkarदीपक केसरकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे