शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वैभववाडी नगरपंचायतीत भाजपने सत्ता राखली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 4:08 PM

शिवसेनेच्या पदरात ५ जागा पडल्या असून तीन अपक्षांमध्ये एक भाजप पुरस्कृत उमेदवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने ९ जागा जिंकून सत्ता राखली आहे. तर शिवसेनेच्या पदरात ५ जागा पडल्या असून तीन अपक्षांमध्ये एक भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आला आहे.पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये काँटे की टक्कर लढतीचे चित्र होते. त्यामध्ये भाजपने १३ पैकी ७ जागांवर वर्चस्व राखत सत्तेच्या चाव्या हाती ठेवण्यात यश मिळवले. तर शिवसेनेला ४ व दोन अपक्षांना लाॅटरी लागली.  दुस-या टप्प्यात झालेल्या चार जागांपैकी भाजप- २ शिवसेना- १ व अपक्ष निवडून आले आहेत. नगरपंचायतीत १७ पैकी भाजप-९, शिवसेना- ५, अपक्ष-२ व भाजप पुरस्कृत अपक्ष- १ असे पक्षीय बलाबल आहे.माजी नगराध्यक्ष : एक विजयी; एक पराभूतया निवडणुकीत माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण प्रभाग ८ मध्ये शिवसेनेतून आणि अक्षता जैतापकर प्रभाग ४ मधून अपक्ष लढले. त्यांच्यापैकी अपक्ष जैतापकर यांनी विजयश्री खेचून आणली. तर चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले.पती-पत्नी झाले नगरसेवकमाजी नगरसेविका सुप्रिया राजन तांबे आणि त्यांचे पती राजन वसंत तांबे ही दोघंही भाजपचे उमेदवार होती. सुप्रिया तांबे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवारावर एका मताने मात करुन विजयी ठरल्या. तर राजन तांबे हे सुद्धा निवडून आले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२vaibhavwadiवैभववाडीBJPभाजपा