शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माझे लढे व्यक्तीविरुद्ध नव्हते, तर..; मंत्री नितेश राणे यांना दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 17:26 IST

युती कुणामुळे तुटली यांचा मंत्री राणेंनी बोध घ्यावा 

सावंतवाडी : माझे सर्व लढे हे शांततेसाठी होते. व्यक्ती विरोधात लढाई कधीच नव्हती. त्यामुळे माझ्यावर कटकारस्थानाचा आरोप करणे चुकीचे असून खासदार नारायण राणे कुटुंबाला त्रास दिला अशी टीका आता करणे योग्य नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असा खुलासा आमदार दीपक केसरकर यांनी केला. तसेच राणे यांची इच्छा असताना कुणामुळे युती तुटली याचा आता मंत्री नितेश राणे यांनीच बोध घ्यावा असे आवाहनही केले. ते शनिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केसरकर म्हणाले, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वरून माझ्यावर टीका केली जाते. पण या हॉस्पिटलची संकल्पना कोणाची होती हे पहिले बघा. हे हॉस्पिटल मंजूर करून मी आणले त्याला ३५ कोटीचा निधी मिळवून दिला तसेच भूमिपूजन ही करण्यात आले आहे. त्यानंतर हे काम रखडण्यामागे कोण आहे याचा विचार आता जनतेने केलेलाच बरा. 

वाचा- नीलेश राणेंना बळीचा बकरा केला जातोय, शिंदेसेनेचे नेते का बोलत नाहीत; मंत्री नितेश राणेंचा सवालकरारनामा काय तो सांगितला नाही येथील राजघराण्याने जो करारनामा केलेला आहे. तो अटी शर्ती विना केला असता तर एवढ्यात हे हॉस्पिटल उभे राहिले असते. पण त्यात घालण्यात आलेल्या जाचक अटीमुळे त्यावर अंतिम स्वरूप येत नसल्याचे आमदार केसरकर म्हणाले. राजघराण्याच्यावतीने लखम सावंत यांनी केलेला खुलासा अत्यंत चुकीचा आहे. त्यांनी अर्धवट माहिती लोकांपर्यंत दिली पण करारनामा काय आहे तो सांगितला नाही असेही केसरकर म्हणाले.

युती होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न केले याचा बोध घ्या२०१४ मध्ये मी जी लढाई लढलो ती व्यक्ती विरोधात नव्हती त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे बोलणे चुकीचे आहे. खरे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती व्हावी ही खासदार राणे यांची इच्छा होती. त्यासाठी मी दोन वेळा त्यांची भेट ही घेतली होती. पण युती होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न केले याचा बोध मंत्री नितेश राणे यांनी घ्यावा असा सल्लाही केसरकर यांनी दिला.आम्ही नीलेश राणे यांच्या पाठीशी   आमदार नीलेश राणे यांना एकाकी पाडल्याचे मंत्री राणे सांगत आहेत. पण आम्ही सर्वजण नीलेश राणे यांच्या पाठीशी आहोत. आम्ही कालही सोबत होतो. पण ज्या व्यक्तीच्या घरात पैसे मिळाले त्याच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. पण पैसे पकडून दिलेल्यावर गुन्हा दाखल होतो हा कुठला न्याय असा सवाल ही केसरकर यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : My fights weren't against individuals, but against injustice: Kesarkar

Web Summary : Deepak Kesarkar refuted allegations of conspiracy, stating his battles were for peace, not against individuals. He challenged Nitesh Rane to understand who thwarted the alliance, highlighting his efforts for a multi-specialty hospital and support for Nilesh Rane.