शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्याला गोरगरीब मुकले

By admin | Updated: June 18, 2015 00:44 IST

रेशनवर खडखडाट : आठ महिने धान्यच नाही...

रत्नागिरी : गेल्या आठ महिन्यांपासून एपीएलधारकांना होणारा धान्यपुरवठा शासनाने बंद केल्याने आमच्यावरच अन्याय का, असा आर्त सवाल जिल्ह्यातील ९८ हजार एपीएलधारकांकडून करण्यात येत आहे.केंद्र सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू झाली. या योजनेच्या प्राधान्य गट तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना धान्यपुरवठा नियमित सुरू आहे. मात्र, एपीएलधारकांना धान्य पुरवठा अनियमित केला गेला. नोव्हेंबर २०१४पासून तर धान्यपुरवठा पुर्णत: बंद करण्यात आला आहे.जिल्ह्यात ९८,१९३ एपीएल शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना प्रति शिधापत्रिका धान्य देण्यात येते. जिल्ह्यासाठी एपीएलधारकांना ५६४ मेट्रिक टन गहू आणि ४६१ मेट्रिक टन तांदूळ इतके नियतन मंजूर आहे. गेल्या १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली ही योजना सुरू झाल्यानंतर तब्बल ३ महिने एपीएलधारकांंना धान्य मिळाले नव्हते. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा धान्य देण्यात आले. जून, जुलै महिन्याचा धान्यपुरवठाही एपीएलधारकांना करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आॅगस्ट महिन्याचे नियतन मंजूर झाल्यानंतर ते १५ आॅगस्टपर्यंत पुण्यातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात येणे गरजेचे होते. मात्र, ते उशिरा २८ आॅगस्टला आल्याने महामंडळाने ते धान्य नाकारले होते. धान्य परत गेल्याने एपीएलधारकांना आॅगस्टच्या धान्यापासून वंचित राहावे लागले. मात्र, त्यानंतर सप्टेंबर आणि आॅक्टोबरचे नियतन मंजूर झाले होते. आता नोव्हेंबरपासून या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठाच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डधारकांची आशा आता मावळलेलीच आहे. या कार्डधारकांना आता काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे शासनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)