कणकवलीत मोबाईलच्या दुकानाला आग, लाखोंचे नुकसान; 'एप्रिल फुल'च्या शक्यतेने अनेकांचे दुर्लक्ष 

By सुधीर राणे | Updated: April 1, 2024 12:07 IST2024-04-01T12:07:15+5:302024-04-01T12:07:56+5:30

कणकवली : कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील जय श्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला आज, सोमवारी सकाळच्या ...

Mobile shop fire in Kankavli, loss of lakhs; Many ignore the possibility of April Fools | कणकवलीत मोबाईलच्या दुकानाला आग, लाखोंचे नुकसान; 'एप्रिल फुल'च्या शक्यतेने अनेकांचे दुर्लक्ष 

कणकवलीत मोबाईलच्या दुकानाला आग, लाखोंचे नुकसान; 'एप्रिल फुल'च्या शक्यतेने अनेकांचे दुर्लक्ष 

कणकवली : कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील जय श्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला आज, सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागली. आगीत मोबाईल व इतर साहित्य जळून खाक झाल्याने  लाखो रुपयांचे नुकसान झाले.

आज, सकाळी सात वाजता आग लागल्याचे काही दुकानदारांच्या निदर्शनास आले. दुकानातून धूर येऊ लागल्यानंतर काहींनी आसपासच्या गाळेधारकांना फोन केले. सुरुवातीला 'एप्रिल फुल' असेल या शक्यतेने आलेल्या फोनकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. राजस्थान येथील व्यापारी असलेल्या जय श्री मोबाईल दुकानच्या मालकाला देखील फोन करण्यात आले. मात्र, तो येईपर्यंत दुकानातील फर्निचर व माल जळून खाक झाला होते. 

या मोबाईल शॉपिला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. अखेर नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Mobile shop fire in Kankavli, loss of lakhs; Many ignore the possibility of April Fools