विनायक राऊतांमुळे कोकणात शिवसेनेची वाताहत!, मनसे नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:47 PM2022-07-26T17:47:18+5:302022-07-26T17:51:43+5:30

खासदार विनायक राऊत मातोश्रीसाठी काहीही करायला तयार असल्याचा आव ते आणतात

MNS General Secretary Parashuram Uparkar criticizes Shiv Sena MP Vinayak Raut | विनायक राऊतांमुळे कोकणात शिवसेनेची वाताहत!, मनसे नेत्याची टीका

विनायक राऊतांमुळे कोकणात शिवसेनेची वाताहत!, मनसे नेत्याची टीका

googlenewsNext

कणकवली : खासदार विनायक राऊत आपल्या शिवसेना सचिव पदाचा गैरवापर करत असतात. मातोश्रीसाठी काहीही करायला तयार असल्याचा आव ते आणतात. मात्र, ही पक्षश्रेष्ठींची फसवणूक आहे. विनायक राऊत यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे शिवसेनेची वाताहत झाली आहे. अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथिल मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, नारायण राणेंच्या शिवसेना बंडानंतर झालेल्या हल्ल्यावेळीही राऊत स्वतःच्या घरात बसून होते. जखमी उमेश कोरगावकरना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला आम्ही पुढे होतो. हल्ला करणारे संजय पडते आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर विनायक राऊत यांना कसलीच झळ बसली नाही. राऊत यांनी नेहमीच गटातटाचे राजकारण करुन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली.

राऊत त्यांनाही सेनेबाहेर घालवतील

माजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार राऊत यांच्या गटामुळे सेनेचेच नुकसान झाले आहे. आम्ही शिवसेनेसोबत म्हणणारे कितीजण सेनेत राहतील आणि कोण उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटात सामील होतील हे लवकरच समजेल. जे निष्ठावान सेनेत राहतील त्यांनाही गटातटाचे राजकारण करून खासदार राऊत सेनेबाहेर घालवतील अशी टीकाही परशुराम उपरकर यांनी यावेळी केली.

Web Title: MNS General Secretary Parashuram Uparkar criticizes Shiv Sena MP Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.