शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अवैध सिलिका मायनिंग विरोधात मनसेचे २५ नोव्हेंबरला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 3:44 PM

कणकवली : सिलिका माफियांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. असा आरोप करतानाच सिलिका वॉशिंग प्लांटचे दूषित पाणी नदीत सोडून जनतेचे ...

कणकवली : सिलिका माफियांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. असा आरोप करतानाच सिलिका वॉशिंग प्लांटचे दूषित पाणी नदीत सोडून जनतेचे आरोग्य अवैध सिलिका व्यावसायिक धोक्यात आणत आहेत. याविरोधात २५ नोव्हेंबरला मनसे कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, संतोष कुडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.   परशुराम उपरकर म्हणाले, कासार्डे, पियाळी, वाघेरी येथील अवैध सिलिका उत्खननाबाबत मनसेने यापूर्वी शासन दरबारी तक्रार केली आहे. तर पालकमंत्री व खासदारांनीही अवैध मायनिंग विषयी केलेल्या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सिलिका मायनिंग बाबत ९ प्रकारच्या ३४८ त्रुटी काढल्या आहेत. सीमांकन नाही, पाण्याचा साठा उपसणे,नदीत दूषित पाणी सोडणे, सिलिका साठ्याची नोंदणी नसणे,वाहतूक परवाना  नसणे आदी त्रुटी आहेत. महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध सिलिका साठ्याची सिलिका माफियांनी चोरी केली आहे. ३० मार्च रोजी कणकवली प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडून आलेल्या अहवालानुसार आपला अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. मात्र, याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील ८ महिन्यात कोणतीही कारवाई केली नाही.

दीडशे ते दोनशे कोटींचा शासनाचा महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि सिलिका माफियांनी संगनमताने बुडवला आहे. पियाळीतील अवैध सिलिका साठयाच्या चोरीविरोधात कारवाई न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार असा इशाराही यावेळी परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसे