आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

By अनंत खं.जाधव | Updated: December 1, 2022 15:37 IST2022-12-01T15:37:15+5:302022-12-01T15:37:51+5:30

या दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

MLA Nitesh Rane met MNS chief Raj Thackeray | आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

सिंधुदुर्ग: कणकवली विधानसभेचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कुडाळ येथे भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई शिरीष सावंत उपस्थित होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे काल, बुधवार पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यानी आज गुरूवारी कुडाळ येथील हॉटेलमध्ये मनसेच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांच्याशी पक्षवाढी संदर्भात चर्चा केली तसेच पत्रकारांशीही संवाद साधला. त्यानंतर दुपारच्या सत्रात आमदार नितेश राणे यांनी ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही. यावेळी भाजपचे स्थानिक नेत्यांसह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Web Title: MLA Nitesh Rane met MNS chief Raj Thackeray