शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने लाखोंचे नुकसान

By admin | Updated: October 1, 2014 00:48 IST

भातशेती आडवी : सलग सहाव्या दिवशी वादळी पाऊस

सिंधुदुर्गनगरी : गेले सहा दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पडझड सुरू असून, दूरध्वनी खांब, विद्युत खांब, घरांवर झाडे पडण्याचे सत्र सुरूच असून, जिल्ह्यात यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे भातशेतीही आडवी झाली आहे. देवगड तालुक्यात ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात घटस्थापनेपासून पावसाने सुरुवात केली असून, केवळ दुपारच्या सत्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. सतत सहा दिवस पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दुपारी दोनच्या सुमारास मुख्यालयात पाऊस पडल्याने साऱ्यांचीच धावपळ उडाली. काही दिवसांनी भातशेती कापणीला वेग येणार आहे. भातशेती नुकतीच बहरात येत असून, वादळी पावसाच्या तडाख्यामुळे भातशेतीही आडवी झाली आहे. त्यामुळे याचा पंचनामा होणे आवश्यक असल्याचे मत काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. भातशेती नुकसानीची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. देवगडमध्ये वीज उपकरणे जळाली, घराचे पत्रे उडालीदेवगड तालुक्यात आज, मंगळवारी झालेल्या पावसामुळे ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये नाद चव्हाणवाडी येथील सखाराम महादेव येरम यांच्या घरावर वीज पडल्याने भिंत कोसळून, तसेच वीज उपकरणे जळाल्याने ६,६५0 रुपयांचे नुकसान झाले. कुणकवण येथील सुमती दत्ताराम राऊत आणि सुरेश सीताराम राऊत यांचा सामाईक गोठा कोसळून ५५ हजारांचे नुकसान झाले. वाघिवरे येथील दीपक मधुकर मांजरेकर यांच्या घराचे पत्रे फुटून चार हजार रुपयांचे, तर साळशी येथील गोविंद भिवा लाड यांच्या घराची कौले उडाल्याने त्यांचे एक हजार रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. (प्रतिनिधी)