शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी यंत्रणा सतर्क

By admin | Updated: March 3, 2015 00:31 IST

ई. रवींद्रन : लोकशाही दिनात ६ तक्रार अर्ज प्राप्त असल्याची माहिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात स्वाईन फ्ल्यूवर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. आवश्यक औषधे व ६ हजार ५०० गोळ््या उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून स्वाईन फ्ल्यूबाबत दक्ष राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, निवासी पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे आदी उपस्थित होते.राज्यभरात स्वाईन फ्ल्यूच्या साथीने थैमान घातले आहे. यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा रूग्ण सापडला नसला तरी आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्ल्यूबाबत तत्काळ दक्षता घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर आवश्यक औषधांसह ६ हजार ५०० गोळ््या उपलब्ध ठेवण्यात आल्या असून आरोग्य यंत्रणेला स्वाईन फ्ल्यूबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ई. रविंद्रन यांनी दिली.पावशी येथील सागर तुळसुलकर यांच्या तक्रार अर्जाबाबत, संबंधित कुडाळ तहसीलदारांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली.लोकशाही दिनात ६ तक्रार अर्जआजच्या लोकशाही दिनात एकूण ६ तक्रार अर्ज प्राप्त झाले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय- १, पोलीस अधीक्षक- १, वीज वितरण कंपनी- २, कृषी विभाग- १, सावंतवाडी नगरपालिका- १ अशा सहा तक्रार अर्जांचा समावेश आहे. प्राप्त तक्रार अर्ज संबंधित कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिली.(प्रतिनिधी)