शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सागरी महामार्ग लवकरच पूर्णत्वास

By admin | Updated: February 1, 2015 00:38 IST

राम शिंदे : पर्यटन महोत्सवाची सांगता; हेल्थ टुरिझमसाठी प्रकल्प आणणार

मालवण : पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा सागरी महामार्ग दोन-तीन वर्षात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग ु रायगड यांपैकी रत्नागिरीला प्रथम निधी देऊन रत्नागिरी-गोवा सागरी महामार्ग पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. तसेच मार्चमध्ये कुवेत दौऱ्यात दोन देशांच्या समन्वयाने धोरण ठरवून हेल्थ टुरिझमचा पहिला प्रकल्प सिंधुदुर्गात आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली. जिल्हा नियोजन समिती, यूएनडीपी, एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणात सुरू असलेल्या सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाचा सांगता सोहळा राज्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, एमटीडीसीचे अधिकारी दीपक माने, निवासी उपजिल्हाधिकारी खुटवड उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सिंधुदुर्ग महोत्सवासारखे इव्हेंट होणे गरजेचे आहेत. महोत्सवाला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर जी बैठक घेतली त्यात पर्यटनाविषयी धोरण आखले आहे. केंद्रात व राज्यात तुम्ही परिवर्तन घडविले आहे. त्यामुळे या उपलब्धीचा वापर करण्यासाठी काही अंशी कायद्यात बदल करावा लागल्यास तोही करू. या भागात पर्यटन व्यावसायिकांचे जे प्रश्न आहेत त्यावर तोडगा काढून येथील पर्यटनला चालना द्यायची आहे. ते म्हणाले, जिल्ह्याचा विकास पर्यटनातून करावयाचा असेल तर स्थानिकांचा पर्यटन उपक्रमांमध्ये सहभाग वाढविणे आवश्यक आहे. येथील निवास न्याहारीधारकांच्या अनेक समस्या आहेत. पर्यटन व्यवसाय हा काही महिन्यांपर्यंत मर्यादित असतो. मात्र, निवास न्याहारीधारकांना व्यावसायिक दराने विजेची आकारणी करण्यात येते. स्थानिकांनी पर्यटकांना सुविधा देण्यासाठी घराघरात निवास न्याहारी योजना सुरू केल्याने त्यांना करातून सूट मिळणे आवश्यक आहे. तोंडवळी-वायंगणी येथे १२०० कोटींचा सी-वर्ल्ड प्रकल्प साकारणार असेल तर त्या गावापर्यंत जाणारे रस्ते सुसज्ज झाले पाहिजेत. जिल्ह्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांपैकी बहुतांश पर्यटक तारकर्ली, देवबाग, वायरी या भागाकडे वळतात. मात्र, तेथे जाणारे रस्ते खूपच अरूंद आहेत. पर्यटकांना तारकर्ली- देवबागपर्यंत विनासायास जायचे असेल तर पर्यायी मार्गाचा विचार करण्यात येऊ शकतो, असेही केसरकर म्हणाले. जिल्ह्यात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे ऐतिहासिक किल्ले पुरातत्व विभागाकडे आहेत. या ठिकाणी स्थानिकांना पर्यटन व्यवसाय करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे स्टॉल उभे करता यावेत, यासाठी राज्य सरकारने केंद्रीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे केसरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)