शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
3
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
5
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
6
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
7
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
8
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
9
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
10
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
11
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
13
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
14
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
15
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
16
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
17
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
18
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
19
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
20
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : पुन्हा एकदा एक मराठा, लाख मराठा नारा घुमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 17:59 IST

जिल्ह्यात मराठ्यांचा आवाज घुमणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देपुन्हा एकदा एक मराठा, लाख मराठा नारा घुमणारगंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घ्यावेत

ओरोस : न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलिसांच्या दडपशाही विरोधात तसेच शासनाला या आंदोलनाची तीव्रता दाखविण्यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठ्यांचा आवाज घुमणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

 आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असून जेलभरो आंदोलनात मराठा समाजाने आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी यावेळी केले.

मराठा आंदोलकांवर जिल्हा पोलीस दलाकडून अन्यायकारक पद्धतीने दाखल केलेल्या गुह्यांबाबत चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ओरोस येथे सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. सुहास सावंत, विक्रांत सावंत, डॉ. प्रवीण सावंत, सतीश सावंत, अशोक सावंत, प्रभाकर सावंत, पुष्पसेन सावंत, जान्हवी सावंत, नागेंद्र परब, धीरज परब यांच्यासह सकल मराठा बांधव उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कसाल पुलाजवळ पोलीस व आंदोलक यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी मराठा समाज कार्यकर्त्यांचे अटकसत्र पोलिसांनी सुरू केले असून ओसरगाव येथील आणखी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकंदरीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून आंदोलन मोडून काढण्याचा पोलीस प्रशासनाचा घाट आहे.

कसाल पूल येथे झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे केवळ २५ जणांवर गुन्हे दाखल न करता सर्व मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करा. ओसरगांव कानसळीवाडी येथे पोलिसांच्या भीतीपोटी अनेक मुले, युवक घरापासून दूर आहेत.

पोलीस अटक करतील या भीतीने ते घरी जात नाहीत. त्यामुळे जिल्हा पोलिसांनी त्या २५ आंदोलकांची नावे जाहीर करावीत. २५ आंदोलकांमध्ये काही विद्यार्थी असल्याने त्यांचे भवितव्य पाहता त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

शासकीय नोकरीमध्ये असलेला मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाला नाही. त्यांना आता या आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत आदी विषयांवर या तातडीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी अ‍ॅड. सावंत म्हणाले, धुमश्चक्री प्रकरणातील नावे कमी होतीलच. परंतु रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत आंदोलकांची नावे जिल्हा पोलिसांनी जाहीर करावीत. आम्ही त्यांना हजर करतो. मात्र, ते ती जाहीर करीत नसल्यास आम्ही देतो ती नावे त्यांनी घ्यावीत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली जाणार आहे. अटकपूर्व जामीन घेणार नसल्याचे सांगून नावे जाहीर करण्यास सांगितले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोणीही घाबरु नये : सुहास सावंतकसाल पुलाजवळ झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी मराठा तरुणांना अटक केली जात असून ओसरगाव कानसळीवाडी येथे पोलीस जाऊन दडपशाही करीत आहेत. त्यामुळे तेथे भितीचे वातावरण निर्माण झाले असून मराठा तरुण आपल्या घरी जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे रविवारी मराठा क्रांती मोर्चा संयोजकांनी त्या ठिकाणी जात परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोणीही घाबरून जावू नये असे आवाहन केले. यावेळी अ‍ॅड. सुहास सावंत, विक्रांत सावंत, सतीश सावंत आदी मराठा बांधव उपस्थित होते.

  1.  
टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्ग