जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार, सिंधुदुर्गात १ लाख ३८ हजार मुलांना होणार जंतनाशक गोळी वाटप

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 12, 2024 06:45 PM2024-02-12T18:45:20+5:302024-02-12T18:45:29+5:30

सिंधुदुर्ग : जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ ...

Many diseases in children due to worms, deworming pills will be distributed to 1 lakh 38 thousand children in Sindhudurg | जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार, सिंधुदुर्गात १ लाख ३८ हजार मुलांना होणार जंतनाशक गोळी वाटप

जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार, सिंधुदुर्गात १ लाख ३८ हजार मुलांना होणार जंतनाशक गोळी वाटप

सिंधुदुर्ग : जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ देणे आवश्यक आहे. यासाठी शासनही आवश्यक ते प्रयत्न करत आहे. शासनाकडून वर्षभरात दोन वेळा जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप केली जाणार असून, जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. तर या दिवशी जी मुले गैरहजर राहणार त्यांना २० फेब्रुवारी रोजी ही गोळी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. कर्तस्कर म्हणाले की, जंतामुळे मुलांमध्ये ॲनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार मळमळ, भूक मंदावणे, आतड्यावर सूज येणे आदी आजार डोके वर काढतात. त्यामुळे १ ते १९ वर्षे वयोगटातील प्रत्येकाला वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देण्याची मोहीम शासनामार्फत दोन वेळा ही मोहीम राबविली जाते. यावर्षीची पहिल्या टप्प्यातील जंतनाशक गोळी वाटप मोहीम १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप मोहिमेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत.

१ ते १९ वयोगटातील प्रत्येकाने वर्षातून दोनदा घ्यायला हवी जंतनाशक गोळी जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ देणे आवश्यक आहे. शासनमार्फत फेब्रुवारी आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत या गोळ्या वाटप केल्या जातात.

या वर्षात एक लाख मुलांना गोळ्यांचे वाटप

जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप होणार असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९८ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. १ ते २ वयोगटातील मुलांना अर्धी पाण्यातून, ३ ते ६ वयोगटातील मुलांना अर्धी चावून खाण्यासाठी तर ७ ते १९ वयोगटातील मुलांना पूर्ण गोळी दिली जाणार आहे.

Web Title: Many diseases in children due to worms, deworming pills will be distributed to 1 lakh 38 thousand children in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.