शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

कोकणात भाजपला धक्का, कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 1:03 PM

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असतानाच करीम इसफ यांच्या नेतृत्वाखाली कोळपे भुसारवाडीतील भाजपच्या अनेक ...

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असतानाच करीम इसफ यांच्या नेतृत्वाखाली कोळपे भुसारवाडीतील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधले.यावेळी आमदार नाईक म्हणाले, आज संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य मुस्लिम बांधव शिवसेनेत दाखल होत आहेत. आज भारतीय जनता पक्ष फक्त भोंग्या सारख्या व लव्ह जिहाद सारखे विषय निर्माण करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या वेळी विरोधकांकडून मशिदीच्या भोंग्यावरून वाद सुरू करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण करू दिली नाही.केंद्र सरकारने जनतेला गेल्या ८ वर्षामध्ये जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली नाहीत.त्यामुळे जनता जाब विचारेल या भीतीने भाजपचे नेते, प्रवक्ते जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काही असंस्कृत लोकांना पुढे करून वाद विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण कोळपे गावातील सर्व मुस्लीम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या कोळपे गावातील व तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी एक कुटुंबप्रमुख व लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच राहीन. आपण सुद्धा सर्वांनी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कार्यतत्पर राहावे.यावेळी शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणारे करीम इसफ यांच्या नेतृत्वाखाली सुलेमान पाटणकर, इम्रान पाटणकर, मोहसीन पाटणकर, अजीम काझी, कय्युम ठाणगे, मुबिन ठाणगे, मुजाहित इसफ, सरदार ठाणगे, सत्तार बवकर, बरकत भेरी, हमीद ठाणगे, इब्राहीम माखना, अजीम ठाणगे,सिराज ठाणगे, अमीर ठाणगे, इस्माईल मुकरी, अकिब ठाणगे, मुअज्जम ठाणगे, नजीर वाघू, इक्बाल काझी मुबिन पाटणकर, शरीफ ठाणगे, रज्जाक इक्बाल, अजीम इसफ, मुश्ताफ काझी, दिलावर भेरी, इम्रान पाटणकर, मोहसीन पाटणकर, अजीम इक्बाल काझी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व  कोळपे बौद्धवाडीतील महिलांनी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले.यावेळी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामियाँ पाटणकर, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, उंबर्डे उपविभाग प्रमुख गौस पाटणकर, उपतालुका प्रमुख श्रीराम शिंगरे, तालुका कार्यकारणी सदस्य पांडुरंग पांचाळ, यशवंत सुर्वे, जयराज हरयाण, विलास पावसकर, गुलझार काझी, समीर लांजेकर, शहाबान राऊत, सल्लाउद्दीन नाचरे, हमीद राऊत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे