शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

सिंधुदुर्ग : माणगाव दत्त मंदिरात रुद्र दत्तयाग सोहळा, दिगंबरा, दिगंबराचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 6:38 PM

माणगाव येथील दत्त मंदिरात श्री रुद्र दत्तयाग सोहळा उत्साहात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने माणगावनगरी दुमदुमली.

माणगाव : येथील दत्त मंदिरात श्री रुद्र दत्तयाग सोहळा उत्साहात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने माणगावनगरी दुमदुमली.दत्तयाग सोहळ्यानिमित्त पूजा, अभिषेक, महापूजा, श्री दत्तयाग जप व हवन आदी विविध कार्यक्रम पार पडले. श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांच्या ध्यानधारणा गुहेवर श्री दत्त पूजेचे आयोजन केले होते. भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

तसेच दत्त मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सलग चार दिवस वाहनांची वर्दळ असल्यामुळे विश्वस्त मंडळातर्फे वाहतूक पोलीस चौकी लावण्यात आली होती.सोहळ्यासाठी भव्य सभामंडप तसेच मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.

चार दिवस चाललेल्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी ठिकाणचे भाविक माणगावनगरीत दाखल झाल्याने माणगाव परिसर गजबजून गेला होता.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिर