ओंबळ येथील एकाचा ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:22 IST2019-05-29T20:22:22+5:302019-05-29T20:22:22+5:30
देवगड तालुक्यातील ओंबळ गावठण येथील हनुमंत शांताराम पवार (३८) यांचा ट्रॅक्टरवरून पडून गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी २.४५ च्या सुमारास शेवरे-ओंबळ येथील श्री महालक्ष्मी अॅग्रो फार्म कंपनी येथे घडली.

ओंबळ येथील एकाचा ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू
शिरगांव : देवगड तालुक्यातील ओंबळ गावठण येथील हनुमंत शांताराम पवार (३८) यांचा ट्रॅक्टरवरून पडून गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी २.४५ च्या सुमारास शेवरे-ओंबळ येथील श्री महालक्ष्मी अॅग्रो फार्म कंपनी येथे घडली.
याबाबत अधिक वृत्त असे की, शेवरे-ओंबळ येथील श्री महालक्ष्मी अॅग्रो फार्म कंपनीत हनुमंत शांताराम पवार हा गेले ७ ते ८ महिने ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी ट्रॅक्टर चालवित असताना वळणावर ट्रॅक्टर पलटी होईल या भीतीने जीव वाचविण्यासाठी चालत्या ट्रॅक्टरवरून उडी घेतल्याने दगडावर आपटून त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली.
शिरगांव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती कंपनीचे मॅनेजर संघरत्न ऊके यांनी शिरगांव पोलीस दूरक्षेत्रात दिली. पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून शिरगांव पोलीस दूरक्षेत्राचे अंमलदार आत्माराम गोसावी, पराग मोहिते अधिक तपास करीत आहेत.
हनुमंत पवार यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.