सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेडसाठी स्वतंत्र नियम लावा-नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 04:25 PM2020-09-29T16:25:35+5:302020-09-29T16:35:33+5:30

सीआरझेड ई- जनसुनावणी ओरोस येथे झाली. त्यात भाजपा आमदार नितेश राणे ऑनलाईन सहभागी झाले होते.या जनसुनावणी वर हरकत घेतांना आमदार नितेश राणे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.

Make separate rules for CRZ in Sindhudurg district! | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेडसाठी स्वतंत्र नियम लावा-नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेडसाठी स्वतंत्र नियम लावा-नितेश राणे

googlenewsNext
ठळक मुद्दे ई- जनसूनावणीत नितेश राणे यांनी मांडल्या हरकती ; तालुकानिहाय फेर जनसुनावणी घ्यादेवगड -जामसंडे नगरपंचायत हद्दीत सीआरझेड नको

कणकवली: सिंधुदुर्गला लाभलेल्या समुद्र किनारपट्टीचा विचार करता सीआरझेडच्या बाबतीत या जिल्हयाचा स्पेशल केस म्हणून विचार केला पाहिजे.किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव,किनारपट्टीवर राहणारे लोक यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर किनारपट्टीवरील नियम-कायदे आणि सीआरझेड वेगळ्या दृष्टिकोनातून तयार करावा. असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

सीआरझेड ई- जनसुनावणी ओरोस येथे झाली. त्यात भाजपा आमदार नितेश राणे ऑनलाईन सहभागी झाले होते.या जनसुनावणी वर हरकत घेतांना आमदार नितेश राणे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.

आजची ई -जनसुनावणी गोंधळलेली,नेटवर्क,आवाज नसलेली होती. त्यामुळे जनतेला आपले म्हणणे मांडता आले नाही.सीआरझेडची ही जनसुनावणी प्रत्येक तालुक्यात जाऊन स्वतंत्रपणे घेण्यात यावी, जेणेकरून प्रत्येकाला आपले म्हणणे मांडता येईल.

जनसुनावणीच्या आधारे सीआरझेड निश्चित करता येणार नाही. सीआरझेड मध्ये देवगड -जामसंडे नगरपंचायतसारख्या आस्थापना येतात. त्यामुळे भविष्यात या सीआरझेड कायद्यामुळे नगरपंचायतचा विकास थांबू शकतो किंवा मर्यादित होऊ शकतो. याचा विचार करून देवगड- जामसंडे शहरांचा विचार करून सीआरझेडचा नियन लावला जावा . तरच या नगरपंचायतला जनतेच्या विकासासाठी फायदा होईल. असे मुद्दे आमदार नितेश राणे यांनी ई- जनसुनावणीत मांडले.

Web Title: Make separate rules for CRZ in Sindhudurg district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.