शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 20:25 IST

राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील.

कणकवलीः राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिवसेनेत होते त्यांना काढलं, काँग्रेसमध्ये होते त्यांना काढलं, आता शेवटचा पर्याय आहे, हा लढा सुसंस्कृत विरुद्ध खुनशी प्रवृती असा आहे. आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे, ते कणकवलीतल्या प्रचारसभेत बोलत होते.  

ही पाठीत वार करणारी औलाद आहे. ज्या पक्षाला सोडून गेले, त्या पक्षाला राणेंचे शाप आहेत. माझ्या मित्राकडे हे नको म्हणून भाजपाला सावध करतोय, भाजपात खूनशी वृत्ती नको. विनायक राऊत थांबले, वैभव नाईक उभा राहिला अन् त्यांना गाडले. आता स्वाभिमान शब्दही सर्वात खूश झाला असेल. वाकवली ती मान आणि म्हणे पक्ष स्वाभिमान. मी भाजपाला सावधानतेचा इशारा द्यायला आलो आहे. ही भुतं तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. मी टीका करायला आलो नाही, मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत कसा बसू?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीका केली आहे. 

दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तोडून-मोडून टाकू, कोकणी जनता भोळी-भाबडी आहे, परंतु अद्यापपर्यंत मर्दुमकी शिल्लक आहे हे कोणी विसरू नये. येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भगवा फडकावू, आम्ही गेली अनेक वर्षे त्यांना पाळले, परंतु आता ते मित्राकडे सुद्धा नको, अशी आमची मागणी होती. तरीसुद्धा त्यांना पक्षात प्रवेश देणाऱ्या भाजपाला आम्ही शुभेच्छा देतो, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या पक्षातला एखादा चांगला उमेदवार दिला असता त्याच्याही प्रचाराला आम्ही आलो असतो. जे समोर उभे आहेत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारून हाकलून लावलं होतं. शिवसेनाप्रमुखांनी यांना हाकलले म्हणून शिवसेना मोठी झाली, त्यानंतर हे काँग्रेसमध्ये गेले मग स्वतःचा पक्ष काढला आता भाजपामध्ये गेले. मी भाजपाला शुभेच्छा देतो. सुसंस्कृत भोळाभाबडा कोकण आणि खुनशी वृत्ती असं चित्र आहे. 10 रुपयांमध्ये गरिबांना जेवण देणार आहे. आता गरिबांच्या जेवणामध्ये मिठाचा खडा टाकू नका.  आपले केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये आपलंदेखील मजबूत सरकार येत आहे. जे तुमच्या आडवे येतील त्यांना हद्दपार केल्याशिवाय मी राहणार नाही. माझा छान हिरवागार कोकण राख करून नाणार उभा करणार असाल तर मला असा विकास नको, जे आहे ते टिकवायचं आणि दुसरं वाढवायचं याला म्हणतात विकास. हे आहे त्याला भुईसपाट करणे म्हणजे विकास नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीUddhav Thackerayउद्धव ठाकरे