शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

Maharashtra Election 2019 : नारायण राणे आणि राजन तेली पाच वर्षानंतर येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 08:39 IST

सावंतवाडी विधानसभा निवडणूक 2019 : एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक उजवे हात  मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी पाच वर्षापूर्वी राणे पासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सावंतवाडी : एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक उजवे हात  मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी पाच वर्षापूर्वी राणे पासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पाच वर्षानंतर सिंधुदुर्गचे राजकारण  बदलले असून, राणे यांनीही काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी राणे हे गुरुवारी दुपारी अडीच वाजता सावंतवाडीत येत आहेत तब्बल पाच वर्षां नंतर  राणे व तेली यांचे राजकीय संबंध जुळले असून, ते प्रथमच एकत्र येणार आहेत. 

राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये दीपक केसरकर यांनी विजय मिळवलेला आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीमधून तर 2014 मध्ये शिवसेनेमधून ते विधानसभेत पोहोचले होते. यावेळी दीपक केसरकर यांच्यासमोर राजन तेली आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आव्हान आहे. मात्र मुख्य लढत ही केसरकरविरुद्ध तेली अशीच होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना भक्कम स्थितीत आहेत. गेल्या निवडणुकीत केसरकर यांनी या मतदारसंघात भाजपा उमेदवार असलेल्या तेलींचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला सुमारे 29 हजार मतांची आघाडी मिळाली होती. मात्र मागच्या तुलनेत आघाडीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. त्यातच भाजपाचे बंडखोर असलेल्या राजन तेली यांना भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते आणि स्वाभिमानचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात युती नावापुरतीच उरली आहे. तसेच सावंतवाडीतील बबन साळगावकर हेही राष्ट्रवादीकडून लढत असल्याने दीपक केसरकर यांना मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. एकंदरीत चित्र पाहता येथे केसरकर आणि तेली यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narayan Raneनारायण राणे Rajan Teliराजन तेली sawantwadi-acसावंतवाडीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019