शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

स्नॅपडील लकी विनरच्या अमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:24 PM

आॅनलाईन वस्तू विक्रीची सेवा देणाऱ्या स्नॅपडील कंपनीचे तुम्ही' लकी विनर ' आहात. तुम्ही १२ लाख ८० हजार रूपयांच्या कारचे विजेते ठरला आहात. अशी बतावणी करून विनायक वामन पुजारे (३३, रा. वाघिवरे, गावठणवाडी) यांना तब्बल ३ लाख ५६ हजारांना अज्ञाताकडून गंडा घालण्यात आला आहे.

ठळक मुद्देचार टप्प्यात वेगवेगळ्या खात्यांवर भरले पैसेअज्ञाताविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कणकवली : आॅनलाईन वस्तू विक्रीची सेवा देणाऱ्या स्नॅपडील कंपनीचे तुम्ही' लकी विनर ' आहात. तुम्ही १२ लाख ८० हजार रूपयांच्या कारचे विजेते ठरला आहात. अशी बतावणी करून विनायक वामन पुजारे (३३, रा. वाघिवरे, गावठणवाडी) यांना तब्बल ३ लाख ५६ हजारांना अज्ञाताकडून गंडा घालण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी विनायक पुजारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक पुजारे हे एका कंपनीत औषध विक्री प्रतिनिधी(एम. आर.) म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे २५ मार्च रोजी डॉक्टरांकडे कंपनीच्यावतीने थेट औषध विक्री करण्याचे काम करत असताना त्यांना मोबाईलवर मनिष कुमार या हिंदी भाषीकाचा कॉल आला.

त्याने तुम्ही स्नॅपडीलचे लकी विनर ठरल्याची बतावणी विनायक पुजारे यांना केली. १२ लाख ८० हजार रूपयांच्या कारचे तुम्ही विजेता ठरल्याचेही सांगितले. काही वेळाने त्यांना त्या व्यक्तीचा पुन्हा फोन आला. तुम्हाला कार हवी की रोख रक्कम आवश्यक आहे? असे विचारले.

यावर विनायक पुजारे यांनी आपल्याला रक्कम द्या, असे सांगितले. त्यासाठी तुम्हाला कंपनीचे एमडी मनिष कुमार यांच्या खात्यावर १२ हजार ८०० रुपए प्रोसेसिंग फी भरावी लागले, अशी मागणी त्या व्यक्तीने केली. त्यानुसार पुजारे यांनी ती रक्कम बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून संबधित व्यक्तीच्या खात्यावर भरली. रक्कम भरल्यानंतर दुपारी १ वाजता पुन्हा फोन आला. तुमच्या रक्कमेची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे़.दुसऱ्या दिवशी २६ मार्च रोजी विनायक पुजारे देवगड तळेबाजार येथे असताना पुन्हा फोन आला. तुम्हाला मिळणाऱ्या रक्कमेची तीन टक्के रक्कम मीर आरीफ यांच्या खात्यावर भरा. त्यानुसार पुजारे यांनी ३८ हजार ४०० रूपयांचा धनादेश दुपारी १२ वाजता बँकेत भरला. त्याच दिवशी पुन्हा ३.३० वाजता हिंदी भाषिकाचा फोन आला.

आपल्याला देत असलेल्या रकमेची प्रक्रीया सुरू आहे. लवकरच पैसे आपल्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. हे फोन वेगवेगळ्या नंबरवरून येत होते. काही कालावधीने पुन्हा फोन आला संबंधित रक्कमेची ७ टक्के जीएसटी भरावी लागणार आहे.

८९ हजार ६०० रुपये एवढी रक्कम बंटी यांच्या खात्यावर भरावी, अशा सूचना विनायक पुजारे यांना देण्यात आल्या. त्यानुसार ८९ हजार ६०० रूपयांचा धनादेश संबंधित खात्यावर सायंकाळी ४.३० वा़जता भरला. भरलेल्या धनादेशानुसार संबंधित संशयीतांच्या खात्यावर रक्कमा वर्ग होत होत्या. मात्र १२ लाख ८० हजार रूपयांची रक्कम पुजारी यांच्या खात्यावर जमा झाली नाही.२७ मार्च रोजी सकाळी १० वाजता पुन्हा संबंधित हिंदी भाषिकाचा वेगळ्या नावाने फोन आला. रक्कम भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आज तुमच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे प्रक्रीया शुल्क म्हणून २ लाख १५ हजार २०० रुपये नवीन यांच्या खात्यावर भरा. त्यानुसार विनायक पुजारे यांनी दुपारी २ वाजता २ लाख १५ हजार २०० रूपयांची रक्कम जमा केली. त्यामुळे २५ मार्च ते २८ मार्च या कालावधीत मोबाईलवर आलेल्या कॉलवरून मिळालेल्या अमिषाने विविध ४ खात्यांवर ३ लाख ५६ हजार रूपयांची रक्कम पुजारे यांनी भरली.

मात्र बक्षीस लागलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार विनायक पुजारे यांनी दिली.त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात संबंधितावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी करीत आहेत.

टॅग्स :onlineऑनलाइनCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग