शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नौका दुर्घटनेत लाखोंची हानी

By admin | Updated: November 5, 2014 23:39 IST

वेंगुर्लेतील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली

वेंगुर्ले : वेंगुर्ले बंदरात तारली व बांगडा पकडण्यासाठी गेलेली उभादांडा नवाबाग येथील विजय अनंत केळुसकर यांची मच्छिमार नौका अतिभारामुळे वेंगुर्ले किनारपट्टीपासून आठ वाव खोल पाण्यात उलटली. मात्र, फायबर बोटीतील १० खलाशांना वाचविण्यात यश आले. यात बोटीच्या दोन इंजिनासह सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी मालवण येथील स्कुबा डायव्हर्सच्या सहकार्याने स्थानिक मच्छिमारांनी ही बोट किनाऱ्यावर आणण्यात यश मिळविले. वेंगुर्ले बंदरात मोठ्या प्रमाणात थव्याने आलेली तारली व बांगडा ही मासळी पकडण्यासाठी नवाबाग येथील विजय अनंत केळूसकर यांची पात दहा खलाशांसह मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता समुद्रात गेली होती. वेंगुर्ले लाईट हाऊससमोरील खोल समुद्रात मासळीने भरलेली पात अतिरिक्त भारामुळे कलंडली. परंतु त्या आधी खलाशांनी पुढील धोका लक्षात घेऊन दूरध्वनीवरून तशा सूचना दिल्या. त्यानुसार मालवण येथील जॉन नऱ्होना यांची ‘जुदित’ आणि वेंगुर्ले येथील ‘गणपती कृपा’ या ट्रॉलर्सनी घटनास्थळी धाव घेत खलाशांचे प्राण वाचविले. बचाव कार्यात संदेश रेडकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा कुबल, जानू चोडणकर, छोटू आडकर, आतू फर्नांडिस, सागर गावडे, दादा केळूसकर, यशवंत तांडेल, नीलेश खडपकर, तुकाराम टांककर, मोेजेस फर्नांडिस यांच्यासह कस्टम कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)पथकाचे प्रयत्नदरम्यान, बुधवारी सकाळपासून बुडालेली बोट व जाळी किनाऱ्यावर आणण्यासाठी स्थानिक मच्छिमार व स्कूबा डायव्हर्सच्या सहकार्याने मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोट किनाऱ्यावर आणण्यात या पथकाला यश आले. मात्र, या दुर्घटनेत बोट, दोन इंजिन तसेच जाळी यांचे मिळून सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.