नेरूरमधील रोंबाट उत्सव मर्यादित साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 05:26 PM2021-04-01T17:26:02+5:302021-04-01T17:27:14+5:30

Holi Kudal Sindhudurg- कुडाळ तालुक्यातील नेरूर सायचेटेंब येथे मांडावर होणारे रोंबाट सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूर सायचेटेंब येथील गावडे यांचे रोंबाट साध्या पद्धतीने आणि कमी देखाव्यांनी साजरे झाले.

Limited celebration of Rombat in Nerur | नेरूरमधील रोंबाट उत्सव मर्यादित साजरा

नेरूरमधील सायचे टेंब येथे शिमगोत्सवानिमित्त धार्मिक कथांवरील देखावे सादर करण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देनेरूरमधील रोंबाट उत्सव मर्यादित साजरा रोंबाट उत्सवावर कोरोना महामारीचे सावट

कुडाळ : तालुक्यातील नेरूर सायचेटेंब येथे मांडावर होणारे रोंबाट सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूर सायचेटेंब येथील गावडे यांचे रोंबाट साध्या पद्धतीने आणि कमी देखाव्यांनी साजरे झाले.

शिमगोत्सवात नेरूर सायचे टेंब येथे गावडे यांचा मांड असतो. तेथे रोंबाट साजरे होते. हे रोंबाट मेस्त्री कुटुंबीय आणि मडवळ कुटुंबीय साजरे करतात. या ठिकाणी विविध प्रकारे खेळ खेळले जातात. तसेच धार्मिक कथांवर देखावे सादर केले जातात. हे देखावे पाहण्यासाठी गोवा राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून नागरिक येतात.

यावर्षी मात्र या उत्सवावर कोरोना महामारीचे सावट पसरले. त्यामुळे आयोजकांनी गाव मर्यादित व कोरोना नियम पाळून हा रोंबाट उत्सव साजरा केला. मेस्त्री कुटुंबीयांनी धार्मिक कथांवर तीन देखावे सादर केले आणि गाव मर्यादित हा उत्सव साजरा झाला.

 

Web Title: Limited celebration of Rombat in Nerur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.