शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ: दोन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 7:51 PM

वायंगणी समुद्रकिनारी गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास श्री देव रवळनाथ पारंपरिक मच्छिमार (रापण) यांच्या मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ पडला. त्यामुळे मच्छिमारी नौकेचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणाला इजा झालेली नाही.

ठळक मुद्दे मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ: दोन लाखांचे नुकसानवायंगणी समुद्र किनाऱ्यावरील घटना

वेंगुर्ले : वायंगणी समुद्रकिनारी गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास श्री देव रवळनाथ पारंपरिक मच्छिमार (रापण) यांच्या मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ पडला. त्यामुळे मच्छिमारी नौकेचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणाला इजा झालेली नाही.वायंगणी किनाऱ्यावर मच्छिमारी करणारा हा जुना रापण संघ आहे. जून महिना सुरू झाल्याने मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे. त्यातच गुरुवारी पहाटे ढगांच्या गडगडाटासह विजांच्या लखलखाटात पाऊस सुरू झाला.

समुद्राचे पाणी वाढत होते. किनाऱ्यांवर असलेल्या आपल्या मच्छिमारी नौकेत पाणी जाऊ नये यासाठी ही नौका मागे ओढण्यासाठी ताता केळजी, बाळू भगत, नाना कोचरेकर, दादा मसुरकर, आबा मुनणकर आदी प्रयत्न करीत होते.

त्याचवेळी आकाशातून एक विजेचा लोळ नौकेवर कोसळला. त्यामुळे नौकेला मुख्य बाजूने मोठी उभी भेग पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यावेळी त्याठिकाणी असलेले बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग