विकासातून मने जिंकण्याचे काम करूया : उदय सामंत, टीकेला उत्तर नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:32 IST2020-12-28T19:31:25+5:302020-12-28T19:32:42+5:30
Kankavli UdaySamant Sindhudurg- राजकारणात कोणी अंगावर आले तर आपण पळवून लावू शकतो हे वैभव नाईक यांच्या रुपाने बघितले आहे. आता कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

कणकवली येथे पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैभव नाईक, संदेश पारकर आदी उपस्थित होते.
कणकवली : राजकारणात कोणी अंगावर आले तर आपण पळवून लावू शकतो हे वैभव नाईक यांच्या रुपाने बघितले आहे. आता कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने येथील श्रीधर नाईक चौकात उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संजय आग्रे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक, सुशांत नाईक, शैलेश भोगले, संदेश सावंत- पटेल, गितेश कडू, रामू विखाळे, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, राजू राणे, नीलम सावंत, मंगेश सावंत, हर्षद गावडे, सुमेधा अंधारी, मानसी मुंज, माही परूळेकर, साक्षी आमडोस्कर, राजू राणे, राजू राठोड, सुजित जाधव, राजू शेट्ये, दिगंबर पाटील व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत म्हणाले, २००४ मध्ये पहिल्यांदा मी आमदार झालो. रत्नागिरी माझी कर्मभूमी असली तरी सिंधुदुर्ग जिल्हा माझी जन्मभूमी आहे. याठिकाणी माझा सत्कार होत आहे याचे समाधान आहे . पुढील वर्षभरात या जिल्ह्यात आपण सांघिकपणे एवढे काम करूया क , विरोधकांची तोंडे कायमची बंद होतील.
असे सांगतानाच आपण केलेल्या सत्काराचा आपल्याला पश्चाताप होणार नाही, याची ग्वाही आपण देतो. येथील श्रीधर नाईक पुतळ्याच्या समोर आपला सत्कार सोहळा होत आहे. त्यांनी विकासाचे जे स्वप्न पाहिले ते आपण सर्वांनी पूर्ण करूया. हीच त्यांना आदरांजली आहे, असे ते म्हणाले.