शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

पानाची पिचकारी पडली ५०० रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:20 IST

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पानाची पिचकारी मारणाऱ्या एका व्यक्तीला ही पिचकारी चांगलीच अंगलट आली आहे. ...

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पानाची पिचकारी मारणाऱ्या एका व्यक्तीला ही पिचकारी चांगलीच अंगलट आली आहे. त्यांच्याविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी त्याला ५00 रुपयांचा दंड ठोठावला आहे. नंदू तळकटकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १६६ चे उल्लंघन ११७ प्रमाणे मनाई आहे. त्याची नोटीस प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली असते. तशी नोटीस जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लावण्यात आलेली आहे. तरीही ओरोस बुद्रुक येथील नंदू शांताराम तळकटकर यांनी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३० वाजताच्या सुमारास याचे उल्लंघन करून पानाची पिचकारी मारली. तळकटकर हे कामानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. यावेळी ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर पानाची पिचकारी मारत असताना अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची गाडी समोर आली. त्यामुळे तुषार पाटील यांनी ते पाहिले. परिणामी पाटील यांनी पानाची पिचकारी मारणाºया व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले.
त्यामुळे याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल पी. एल. सारंग यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिली. त्याला पोलीस नाईक व्ही. डी. कोयंडे व पोलीस शिपाई के. एम. पावसकर साक्षीदार आहेत. पानाची पिचकारी मारून नियमभंग करणाºया तळकटकर यांना मुख्य न्याय दंडाधिकारी फडतरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला.