उभादांडा येथील बीचवर पतंग महोत्सवाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:45 IST2020-02-25T14:41:36+5:302020-02-25T14:45:20+5:30
माझा वेंगुर्लातर्फे पर्यटकांसह स्थानिकांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात येणारा हा पतंग महोत्सव कौतुकास्पद आहे. इतर किनाऱ्यांपेक्षा वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी कमी असते. त्यामुळे याठिकाणी पर्यटक स्थिरावण्यासाठी प्रयत्न करावेत.

उभादांडा येथील बीचवर पतंग महोत्सवाचा शुभारंभ
वेंगुर्ला : माझा वेंगुर्लातर्फे पर्यटकांसह स्थानिकांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात येणारा हा पतंग महोत्सव कौतुकास्पद आहे. इतर किनाऱ्यांपेक्षा वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी कमी असते. त्यामुळे याठिकाणी पर्यटक स्थिरावण्यासाठी प्रयत्न करावेत.
उभादांडा गाव हा मंगेश पाडगांवकरांच्या स्मारकासाठी कवितांचा गाव म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे उभादांडा गावाचे नाव जागतिक स्तरावर होईल. उभादांडा ग्रामपंचायतीने त्यासाठी सभा घेऊन प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी केले.
माझा वेंगुर्लातर्फे उभादांडा येथील बागायत बीचवर २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवस भव्य-दिव्य असा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पतंग उडवून झाले. या पतंग महोत्सवात गुजरात-वापी येथील पतंग उडविणारी फ्लाय ३६० टीम उपस्थित होती.