शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अमर रहे! शहीद सुभेदार सुनील सावंत यांना अखेरची सलामी; पार्थिव घरी पोहचताच पत्नीसह मुलांनी फोडला टाहो

By अनंत खं.जाधव | Updated: September 16, 2023 17:29 IST

सावंतवाडी : १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत (46, रा. कारिवडे भैरववाडी) हे बुधवारी पंजाब येथे ...

सावंतवाडी : १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत (46, रा. कारिवडे भैरववाडी) हे बुधवारी पंजाब येथे परेड सुरू असताना शहीद झाले. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी कारिवडे या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. यावेळी ग्रामस्थ जिल्हा प्रशासन, सैनिक तसेच पोलिसांच्या वतीने गावातील शाळेपासून त्याच्या घरापर्यंत साश्रू नयनात मिरवणूक काढण्यात आली.यावेळी जय जवान जय किसान, सुभेदार सुनील सावंत  अमर रहे अमर रहे अशा घोषणा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पार्थिव घरी पोचताच पत्नीसह मुलांनी नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. यावेळी सर्वाचे मन हेलावून गेले होते. घरी पोचल्यानंतर पार्थिवाचे कुटुंबाने अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पोलिस व सैनिक याच्या बॅडवर अंत्ययात्रा काढत वीर मातेच्या सुपुत्रावर साश्रू नयनांत अंत्यसंस्कार करण्यात आले.सुभेदार सुनील सावंत हे युनिट पंजाबमध्ये कार्यरत होते. नेहमीप्रमाणे जवानांची परेड सुरू होती. त्यावेळी धावताना सुभेदार सावंत चक्कर येऊन खाली पडले. त्यातच ते शहीद झाले. याबाबत सावंत कुटुंबियांना माहिती देण्यात आली. त्याचे काही नातेवाईक पंजाबकडे रवाना झाले त्यानंतर तेथील सर्व सोपस्कार पूर्ण करून शहीद सुनिल सावंत यांचे पार्थिव शूक्रवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दिल्ली, गोवा मार्गे त्याच्या मूळ गावी कारिवडे येथे आज, दुपारच्या सुमारास त्याचे पार्थिव दाखल झाले.जिल्हा प्रशासन तसेच कारिवडे सरपंच आरती माळकर यांनी सुभेदार सावंत यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शाळेपासून घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळकरी मुले, ग्रामस्थ, माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पार्थिव घरी पोहचताच पत्नी अन् मुलांचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. काही वेळातच पार्थिव अंतिम संस्कारासाठी हलविण्यात आले.जिल्हा प्रशासनाकडून निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तर यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसिलदार श्रीधर पाटील, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, माजी आमदार राजन तेली, प्रविण भोसले, वसंत केसरकर, महेश सारंग, रविंद्र मडगावकर, रूपेश राऊळ, सुनिल राऊळ, मंगेश तळवणेकर, आनंद तळवणेकर आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, माजी सैनिक, सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग