वैभववाडीतील करुळ घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 14:58 IST2021-06-13T14:54:48+5:302021-06-13T14:58:12+5:30
पोलीस जेसीबीसह घटनास्थळी; मात्र बांधकाम यंत्रणा सुशेगाद

वैभववाडीतील करुळ घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत
वैभववाडी : मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ही घटना रविवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी दरड जेसीबीच्या साह्याने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.
गेले दोन दिवस तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे करुळ घाटात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. वाहन चालकांनी याची माहिती करुळ चेक नाक्यावर पोलिसांना दिली. वैभववाडी पोलीस ठाण्यात मेसेज येताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव व सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनीच जेसीबीला पाचारण केले. व जेसीबीच्या मदतीने दरड बाजूला करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलीस श्री. राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड आदी उपस्थित होते.