आंबोली घाटात पोलिस व्हॅनवरच कोसळली दरड, मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 19:18 IST2019-08-06T19:17:18+5:302019-08-06T19:18:37+5:30
आंबोली घाटात कोसळलेले झाड बघण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या व्हॅनवरच दरडीची माती कोसळली

आंबोली घाटात पोलिस व्हॅनवरच कोसळली दरड, मोठा अनर्थ टळला
आंबोली - आंबोली घाटात कोसळलेले झाड बघण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या व्हॅनवरच दरडीची माती कोसळली सुदैवाने कोणालाही इजा झाली नसली तरी व्हॅनवर माती कोसळत असल्याचे बघून चालकांने व्हॅन मागे घेतली खरी मात्र ती घाटांच्या संरक्षक कठडा असल्याने बचावली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या दरडीच्या माती मात्र पोलिसांची व्हॅन अडकल्याने ती उशिरा पर्यत बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
गेले चार दिवस आंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाउस कोसळत असून,या पावसामुळे ठिकठिकाणी घाटात झाडे कोसळली यांची माहीती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस व्हॅन घेउन घटनास्थळी रवाना झाले मात्र जात असतनाच वाटतेच दरडीची माती पोलिस व्हॅनव र आली चालकांने प्रसगावधन राखत व्हॅन मागे घेण्याचा प्रयत्न केला मात्र व्हॅन मागे घेत असतनाच आंबोली घाटांच्या संरक्षक कठड्याला अडकली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
त्यातच दरडीची माती रस्त्यावर आल्याने पोलिसांची ही पेट्रोलिग व्हॅन त्या मातीतच अडकून बसली उशिरा पर्यत ही व्हॅन काढण्याचे प्रयत्न सुरू होते.या पोलिस व्हॅन मध्ये पोलिस हेडकॉस्टेबल विलास कुभार यांच्यासह कर्मचारी राजेश गवस होते.