शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेख उपअधीक्षकाला सश्रम कारावासाची शिक्षा

By admin | Updated: December 31, 2014 00:21 IST

लाच प्रकरण : विशेष न्यायाधीशांचा निकाल

सिंधुदुर्गनगरी : जमीन मोजणीचा नकाशा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेल्या कुडाळ भूमिअभिलेख कार्यालयाचे तत्कालीन उपअधीक्षक मोहन बापू ओटवणेकर (वय ५८, सावंतवाडी गणेशनगर) यांना सिंधुदुर्गनगरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. ओरोस-सावंतवाडा येथील सलीम महम्मद शेख यांनी आपल्या ग्रॅनाईड खनिकर्माच्या जमिनीच्या मोजणीसाठी कुडाळ भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. शेख यांची पत्नी खुदेजा बानू हिच्या नावाने असलेला हा खनिकर्म पट्टा नारूर (कुडाळ) येथे होता. मोजणीसाठी मोहन बापू ओटवणेकर यांच्याकडे भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. ओटवणेकर यांनी मोजणी केली. मात्र, नकाशे देण्याचे बाकी होते. या नकाशाच्या मागणीसाठी सलीम शेख वारंवार भूमिअभिलेख कार्यालयात जात. मात्र, ओटवणेकर नकाशा देण्यास टाळाटाळ करीत. १० जानेवारी २०११ रोजी शेख कुडाळला भूमिअभिलेख कार्यालयात गेले असता ओटवणेकर याने त्यांच्याकडून नकाशासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. यावरून शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.दरम्यान, या तक्रारीनुसार १२ जानेवारी २०११ रोजी कार्यालयातच ओटवणेकर याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक दीपक बांदेकर यांनी पकडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम क्र. ७ तसेच १३ (१) (डी) त्यासोबत कलम १३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. यावर आज, मंगळवारी अंतिम सुनावणी होऊन ओटवणेकर याला प्रत्येकी चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, तर दोन हजार रुपये दंडही ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. सुनावणी दरम्यान ११ साक्षीदार तपासले. अ‍ॅड. अमोल सामंत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. (प्रतिनिधी)