शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

करवंटीपासून दिवे अन् आकाश कंदील, दीपोत्सवासाठी विकल्पच्या टीमची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:47 IST

रक्षाबंधन सणाला करवंटीपासूनच्या राख्यांचा नवा ब्रँड निर्माण करणाऱ्या मालवणातील विकल्पच्या टीमने आता दिवाळी सणासाठी पुन्हा एकदा नारळाच्या टाकाऊ (जळाऊ) करवंटीपासून सुबक, आकर्षक, पर्यावरणपूरक वस्तूंचा विकल्प निर्माण केला आहे.

ठळक मुद्दे करवंटीपासून दिवे अन् आकाश कंदील, दीपोत्सवासाठी विकल्पच्या टीमची निर्मितीकरवंटीवर आकर्षक कलाकुसर; मुंबई, पुण्यातून आगाऊ बुकिंग; हसन खान यांची माहिती

सिद्धेश आचरेकर मालवण : रक्षाबंधन सणाला करवंटीपासूनच्या राख्यांचा नवा ब्रँड निर्माण करणाऱ्या मालवणातील विकल्पच्या टीमने आता दिवाळी सणासाठी पुन्हा एकदा नारळाच्या टाकाऊ (जळाऊ) करवंटीपासून सुबक, आकर्षक, पर्यावरणपूरक वस्तूंचा विकल्प निर्माण केला आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा पर्यावरण अभ्यासक हसन खान व त्यांच्या टीमने यावर्षीचा दीपोत्सव द्विगुणित करण्यासाठी करवंटीपासून दिवे, कंदील तसेच झुमर, शो-पीस आदी उत्पादन निर्मिती केली आहे.निसर्गाच्या अस्तित्वावर आपले अस्तित्व अवलंबून आहे. पण प्लास्टिकच्या विळख्यात आपण स्वत:ला अडकवून ठेवले आहे. प्लास्टिकला पर्याय शोधणे ही विकल्पची प्राथमिकता आहे. अशा पर्यावरणपूरक वस्तू आम्ही आपणा समोर आणत आहोत. प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात असे छोटे घटक, कृती मोठा आघात पर्यावरणावर करीत असतात. करवंटीला चुलीमधून बाहेर काढून या इंधनाचे धनरुप समाजासमोर आणण्याचा ह्यविकल्पह्णच्या टीमचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रा. खान यांनी दिली.विकल्प हा पर्यावरणपूरक वस्तू बनविणारा लघुउद्योग आहे. विकल्पच्या टीममध्ये हसन खान यांच्यासह त्यांच्या पत्नी अमरिन खान, अजय आळवे, पायल शिरपुटे व मधुरा ओरसकर यांचा समावेश आहे. हसन खान यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या नव्या व्यवसायाची प्रत्येकाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

करवंटी कापण्यापासून तिला आकार देण्याचे काम स्वत: खान व अजय तर रंगरंगोटी व नक्षी कोरण्याचे काम पायल व मधुरा करतात. तर साचा बांधणीचे काम अमरीन या करतात. यातील अजय, पायल व मधुरा हे तिघे खान यांचे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी घरी दिलेले काम जबाबदारीने पूर्ण करतात.लोक करवंटीचा इंधन म्हणून वापर करतात. त्यामुळे आपल्याकडील भागात बहुतांश घरांमध्ये प्रदूषण होते. करवंटी विकत घेतल्याने गावागावातील प्रदूषण टळेल या हेतूने मालवणसह पेंडूर, काळसे या गावातून आम्ही प्रति किलो सात रुपये दराने करवंटी खरेदी करतो. प्लास्टिक किंवा तत्सम वस्तूमुळे पर्यावरणावर आघात होतो. त्यामुळे त्या वस्तूंना पर्यावरणपूरक पर्याय देणे हीच आपली भूमिका आहे, असे खान यांनी सांगितले.विकल्पची दिवाळीसाठी नावीन्यपूर्ण निर्मितीविकल्पच्या टीमने यावर्षीच्या दिवाळी सणाकरिता लहान, मध्यम, मोठे, फुलवात असे चार प्रकारचे करवंटी दिवे बनविले आहेत. तर करवंटीपासून एलईडी लाईटचे लहान, मोठ्या अशा दोन प्रकारात हँगींग लॅम्पची निर्मिती केली आहे. चौकोनी, वर्तुळाकार, षटकोनी आकारात करवंटीपासून आकाश कंदील बनविण्यात येत आहेत.

या बनविण्यात आलेल्या वस्तूंवर कलाकुसर असेल. शिवाय ग्राहकाच्या मागणीप्रमाणेही नक्षीकाम करून दिले जाणार आहे. मुंबई, पुण्यातून आगाऊ बुकिंगही झाली आहे. करवंटीपासूनच्या वस्तूची आॅर्डर बुक करण्यासाठी हसन खान किंवा ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन खान यांनी केले आहे.पर्यावरण संवर्धनासही हातभारपर्यावरणपूरक संकल्पना वेगवेगळ्या टीम करून मुलांना देत आहोत. ज्यातून छोटे छोटे लघुउद्योग निर्माण होतील आणि मुलांना अर्थार्जनाचा मार्ग मिळेल. यातून नकळत पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये हातभारदेखील लागेल. प्रत्येक घरात हा लघुउद्योग स्वयंपूर्ण व्हायला हवा अशी धारणा असल्याने प्लास्टिकसारख्या घातक वस्तूंना पर्याय म्हणून आम्ही पर्यावरणपूरक वस्तूंचा विकल्प देत आहोत, असे विकल्प टीमने स्पष्ट केले. 

टॅग्स :Diwaliदिवाळीenvironmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्ग