कोकण पुणेमार्गे थेट लंडन, मंगेश पारकर यांच्या झाडू विणण्याच्या कलेची मोहिनी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 4, 2025 12:27 IST2025-06-04T12:26:17+5:302025-06-04T12:27:47+5:30

ना कोणता आधुनिक कारखाना, ना विपणन करणारी माणसं आणि ना डिजिटल मार्केटिंग

Konkan to London via Pune, the charm of Mangesh Parkar broom weaving art | कोकण पुणेमार्गे थेट लंडन, मंगेश पारकर यांच्या झाडू विणण्याच्या कलेची मोहिनी

कोकण पुणेमार्गे थेट लंडन, मंगेश पारकर यांच्या झाडू विणण्याच्या कलेची मोहिनी

महेश सरनाईक

सिंधुदुर्ग : कोकणात दूरगामी भागात नावीन्यपूर्ण व्यवसाय करणारे असे कित्येक जिज्ञासू व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना सोशल मीडियावरून इन्फ्लुएन्सर बनून डिजिटल मार्केटिंग करता आले नाही, त्यात यश मिळविता आले नाही. पण, यांच्या हातातील कलेने उपभोक्त्यांना मोहिनी घातली आहे.

मंगेश सखाराम पारकर, नाम तो सुना नही होगा.. कुडाळ तालुक्यातील तेंडोलीसारख्या एका दुर्गम गावात राहणारा हा सर्वसामान्यांपेक्षा अतिसामान्य असा कोकणातला माणूस! जो दिवस भर शेतात राबल्यानंतर आपली कला जोपासतो आणि केरसुनी (वाडवण) अर्थात झाडू बनवतो. या झाडू मुंबई, पुणे, नागपूर तसेच महाराष्ट्राच्या बाहेर जातातच, पण चक्क पारकरांनी रचलेल्या माडाच्या हिरांना लंडनमधून ऑर्डर आली आहे. त्यांच्या झाडून कोकण, पुणे मार्गे थेट लंडनला पोहोचल्या आहेत.

लंडनमध्ये अदाकारी

माणसाकडे आयुष्यात आवड नाही, तो माणूस फक्त श्वासाने जिवंत आहे. कोकणातील ही वाडवण विणण्याची कला आज लंडनमध्ये कलाकारी दाखवत आहे. कोकणातील अनेक गुणी आणि ज्ञानवंत कलाकार किंवा उत्पादकांपैकी मंगेश पारकर त्यातील एक...

जसे आरडरी येतंत तसे बनवंतय..

ना कोणता आधुनिक कारखाना, ना विपणन करणारी माणसं आणि ना डिजिटल मार्केटिंग. पण पारकरांच्या भाषेत “दिवसभर शेती केल्यावर संध्याकाळी येळ घालवूक वाडवणी वळतंय, जसे आरडरी येतंत तसे बनवतंय.”

कारागिराच्या कल्पकतेची सर नाही

पाहायला गेला तर पारकरांचा व्यवसाय हा खरं तर जागतिक पातळीचा झालेला आहे. पण, स्वतःच्या कलेचा गर्व न बाळगता स्वाभिमानाने व्यवसाय करतात. एक आवड म्हणून, कला जोपासावी म्हणून.. चिनी बनवटीच्या झाडू कितीही सुबक, टूमदार दिसली तरी कारागीराच्या कल्पक्तेची सर त्यांना नाही.

स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबुतीसाठी अतिसूक्ष्म भूमिका

स्वदेशी म्हणजे फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, उद्योग समूह नाही तर मध्यम व सुक्ष्म व्यवसाय जे स्थानिक पातळीवर उत्पादन करून देशामध्येच किंवा परदेशात ते विकले जातात व आपला पैसा आपल्याकडेच पुन्हा फिरतो.. मंगेश पारकर यांच्यासारखे अनेक कारागीर आज कोकण प्रांतात, प्रदेशात, राष्ट्रीय पातळीवर स्वदेशी अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात अतिसूक्ष्म अशी भूमिका साकारतात.

Web Title: Konkan to London via Pune, the charm of Mangesh Parkar broom weaving art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.