शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 12:17 IST

गेली काही वर्षे या हळवल फाट्यावरील वळणावर महामार्गाचे चौपदरीकरण होऊन देखील सातत्याने अपघात होत आहे

कणकवली : मालवाहतूक  करणाऱ्या आयशर टेम्पोला मुंबई- गोवा महामार्गावरील कणकवली गडनदी पुलाजवळ हळवल फाट्यानजिक अपघात झाला. या अपघातात टेम्पोतील क्लिनर जागीच ठार झाला आहे. तर चालकाने टेम्पोतून खाली उडी मारल्याने तो बचावला आहे. रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.आकाश आप्पासो महाजन (२९, रा. मल्हारपेठ, ता. पन्हाळा, कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९ सी. ए.१२८२) घेऊन कोल्हापूर येथून सावंतवाडी बांद्याच्या दिशेने किराणा सामान, पशुखाद्य घेऊन जात होता. हळवल फाटा येथे अचानक  टेम्पोवरील त्याचा ताबा सुटल्याने तो डाव्या बाजूला कलंडला. या अपघातात टेम्पोचा क्लीनर शुभम महादेव झोंजाळ (२६,रा. मल्हारपेठ ,ता.पन्हाळा, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला.या अपघाची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पोलीस पाटील सुनील कदम ही दाखल झाले. तसेच पोलिसांना अपघाताची  माहिती देण्यात आली. त्यामुळे  महामार्ग वाहतूक  शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव यांच्यासह त्यांचे पथक तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,उपनिरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस शिपाई किरण कदम,उद्धव साबळे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो हलवून अडकलेल्या शुभम झोंजाळ याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.अपघात घडल्यानंतर घाबरलेला टेम्पो चालक आकाश महाजन हा घटनास्थळावरून पळून गेला होता. तो थोड्यावेळाने परत तिथे आला.त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.तसेच त्याच्या कडून अपघाताची माहिती घेतली. या अपघातात टेम्पोचे मोठे  नुकसान झाले आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.सातत्याने होतात अपघातातदरम्यान, गेली काही वर्षे या हळवल फाट्यावरील वळणावर महामार्गाचे चौपदरीकरण होऊन देखील सातत्याने अपघात होऊन संबंधित यंत्रणा पूर्णपणे या स्थितीकडे डोळेझाक करत आहे. तेथे सातत्याने होत असलेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले तर काहींना जीव गमवावा लागला आहे. हे अवघड वळण अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. सातत्याने अपघात होऊन तसेच या ठिकाणी असलेले स्टॉल हटवण्यासंदर्भात मागणी करून देखील कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने प्रशासन अजून किती बळी जाण्याचा वाट पाहते आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू