कुडाळात खवले मांजर आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:49 IST2018-11-28T16:47:42+5:302018-11-28T16:49:11+5:30
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कुडाळ येथील कार्यालयात मंगळवारी सकाळी खवले मांजर आढळून आल्याने खळबळ उडाली

खवले मांजराला वनविभागाच्या कर्मचाºयांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. (रजनीकांत कदम)
सिंधुदुर्ग : पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कुडाळ येथील कार्यालयात मंगळवारी सकाळी खवले मांजर आढळून आल्याने खळबळ उडाली. या खवले मांजराला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन सुरक्षितरित्या वन अधिवासात सोडले.
कुडाळ पंचायत समिती कार्यालयाच्या जवळच पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यालय असून, हे कार्यालय मंगळवारी सकाळी उघडल्यानंतर कार्यालयात खवले मांजर असल्याचे कर्मचाºयांना दिसून आले. या खवले मांजराबाबत त्यांनी तत्काळ कुडाळ वनविभागाला माहिती दिली. काही वेळातच वन विभागाचे एक पथक तेथे दाखल झाले. त्यांनी खवले मांजराला पकडून वन अधिवासात सोडले. या कार्यालयाच्या मागच्या बाजूस जंगलमय परिसर आहे. तसेच भंगसाळ नदीही जवळ असून, या जंगलमय परिसरातूनच हे खवले मांजर आले असावे, असा अंदाज आहे.
Attachments area