खारेपाटण शाळा अभिमानास्पद : विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:42 IST2020-12-28T19:36:54+5:302020-12-28T19:42:37+5:30
Education Sector Vinayak Raut sindhudurg -माझ्या लोकसभा मतदार संघातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी केंद्रशाळा, खारेपाटण क्रमांक १ ही संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी शाळा आहे. या शाळेने राज्यातील इतर शाळांना आदर्श घालून दिला आहे, असे उद्गार खासदार विनायक राऊत यांनी खारेपाटण केंद्रशाळेच्या भेटीदरम्यान काढले.

खारेपाटण केंद्रशाळा क्रमांक १ येथे आयोजित कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, शैलेश भोगले, शरद वायंगणकर उपस्थित होते. (छाया : संतोष पाटणकर)
खारेपाटण : माझ्या लोकसभा मतदार संघातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी केंद्रशाळा, खारेपाटण क्रमांक १ ही संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी शाळा आहे. या शाळेने राज्यातील इतर शाळांना आदर्श घालून दिला आहे, असे उद्गार खासदार विनायक राऊत यांनी खारेपाटण केंद्रशाळेच्या भेटीदरम्यान काढले.
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, खारेपाटण क्रमांक १ ची राज्यातील आदर्श मॉडेल शाळा म्हणून निवड केल्याच्या पार्श्वभूमीवर या शाळेतील शिक्षकांचे व मुलांचे अभिनंदन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी खासदार राऊत हे खारेपाटण येथे आले होते.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर, महिला आघाडीप्रमुख अंजली पांचाळ, वारगाव सरपंच प्रकाश नर, खारेपाटण-तळेरे शिवसेना विभागप्रमुख महेश कोळसुलकर, संतोष गाठे, खारेपाटण येथील मधुकर गुरव, मंगेश गुरव, गुरुप्रसाद शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर, उपाध्यक्ष आण्णा तेली, शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, शिवाजी राऊत, मनोज करंदीकर, ऋषिकेश जाधव, प्रदीप इसवलकर, शिवाजी राऊत, पवन कासलीवाल, पूजा कासलीवाल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत यांनी खारेपाटण केंद्रशाळेला रोख ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर, शिक्षक संजय राऊळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पाटणकर यांनी केले तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले.
प्रदीप श्रावणकर यांचा राऊतांच्या हस्ते सत्कार
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर व उपाध्यक्ष आण्णा तेली यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खारेपाटण केंद्रशाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा खासदार राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.