शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

काणेकरांनी राजकारणापलिकडे नाती जपली

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

नारायण राणे यांची आदरांजली : शोकसभेला सर्वपक्षीयांची गर्दी

बांदा : श्रीपाद काणेकर यांनी केवळ समाज हितासाठी, समाज घडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी नाती जपली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच आग्रही असायचे. त्यांचासारखा त्यागी वृत्तीचा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही. त्यांच्यातील समाजशीलतेचे गुण आपण आत्मसात केल्यास हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे आयोजित शोकसभेत केले.भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीपाद काणेकर यांची शोकसभा येथील संतोषी माता मंगल कार्यालयात सोमवारी झाली. यावेळी काणेकर यांच्या विविध आठवणींना उजाळा देत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दीपक केसरकर, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी खासदार नीलेश राणे, काका कुडाळकर, राजेंद्र म्हापसेकर, सरपंच प्रियांका नाईक, प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, विलास हडकर, प्रभाकर सावंत, श्यामकांत काणेकर, पुखराज पुरोहित आदी उपस्थित होते.नारायण राणे यांनी यावेळी युती शासन काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. युती शासन काळात निवडणुकांसाठी होणाऱ्या बैठकांना भाजपाला किती जागा मिळवायच्या याचे कौशल्य त्यांचेकडे होते. काजू व्यवसायावरील सेल टॅक्स कमी करावा, अशी मागणी त्यांनी आपण मुख्यमंत्री असताना केली होती. आपल्या विधानसभेतील पराभवाबाबत त्यांनी फेसबुकवर नारायण राणे हरले नाहीत तर कोकण हरले, अशी प्रतिक्रिया दिली होती.माधव भंडारी म्हणाले की, श्रीपाद काणेकर हे अभ्यासू वृत्तीचे होते. नवीन विचार, विषय जाणून घेण्याची त्यांची प्रवृत्ती होती. या वयातही ते माहिती तंत्रज्ञानात पारंगत होते. जिल्ह्यात भाजपाच्या उभारणीत त्यांचे महत्वाची योगदान होते. तळागाळात त्यांनी खडतर परिश्रमातून त्यांनी कार्य केले. माजी राज्यमंत्री भाई गिरकर म्हणाले की, श्रीपाद काणेकर हे खऱ्या अर्थाने किंग मेकर होते. मात्र किंग होण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही.विलास हडकर, पुखराज पुरोहित, श्यामकांत काणेकर यांनी श्रीपाद काणेकरांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजु परब, भाजपा तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, माजी सरपंच शितल राऊळ, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, स्वप्निल नाईक, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, अन्वर खान, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदिप कुडतरकर, गुरुनाथ सावंत, राजन कळंगुटकर, बाळा आकेरकर, सनी काणेकर, सिध्देश पावसकर, सुनिल धामापूरकर, दादु कविटकर, साई कल्याणकर आदींसहसर्वपक्षिय कार्यकर्ते उपस्थितहोते. (प्रतिनिधी)