शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सनईने कणकवलीवासीय मंत्रमुग्ध

By admin | Updated: March 3, 2015 00:36 IST

कणकवलीत संगीत महोत्सव : शैलेश भागवत यांचे सनई वादन

कणकवली : मंगल वाद्यांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या सनईचे सूर अलीकडे कानावर पडणे दुरापास्त झाले आहे. मात्र, राष्ट्रीय कीर्तीचे सनईवादक पं. शैलेश भागवत यांच्या सनई वादनाने कणकवलीवासीय मंत्रमुग्ध झाले. सनईचे सुमधूर सूर ऐकण्याची संधी रसिकांना अविस्मरणीय आनंद देऊन गेली. निमित्त होते ते वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवातील सनई वादनाचे.आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवात शनिवारी रात्री पं. शैलेश भागवत यांनी सनई वादन केले. संगीत मैफिलीचा प्रारंभ त्यांनी राग ‘शंकर’ने केला. लवकरच होळीच्या उत्सवाला सुरुवात होणार असल्याने होळी रागातील गीत सनईवर त्यांनी सादर केले. एकाहून एक सरस असे राग त्यांनी सनईद्वारे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांनी आपल्या सनई वादनाने अजरामर केलेला राग ‘मालकंस’ पं. शैलेश भागवत यांनी सादर करून रसिकांची दाद मिळवली. रसिकांच्या आग्रहाखातर ‘गुंज उठी शहनाई’ या चित्रपटातील ‘तेरे सूर और मेरे गीत’ हे गाजलेले गीत त्यांनी सादर केले, तर ‘नटबिहाग’ या रागाने मैफिलीची सांगता केली. आपण प्रथमच कणकवलीतील या संगीत महोत्सवानिमित्त येथे आलो असल्याचे सांगत येथे निमंत्रित केल्याबद्दल तरंगिणी प्रतिष्ठान व आचरेकर प्रतिष्ठानचे त्यांनी आभार मानले.महोत्सवातील संगीत मैफिलीचा प्रारंभ प्रतिष्ठानच्या सघनगान केंद्रातील विद्यार्थिनी सुहिता केरकर हिच्या गायनाने झाला. ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने तिने मैफिलीची सांगता केली.आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळेला शनिवारी प्रारंभ झाला. देवकी पंडित यांची गायन कार्यशाळा, तर पं. शैलेश भागवत यांची सनई वादनाची कार्यशाळा याअंतर्गत झाली. (वार्ताहर) देवकी पंडित यांच्या गायनाने रंगतसुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्या गायनाने या संगीत महोत्सवात आणखीनच रंगत आणली. ‘राजश्री’ या रागाने त्यांनी संगीत मैफिलीला सुरूवात केली. जगप्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांनी या रागाची निर्मिती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर सोनी, दुताई या दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. देवकी पंडित यांचे गायन ऐकण्याची शास्त्रीय संगीतातील जाणकारांना एक पर्वणीच या महोत्सवाच्या माध्यमातून लाभली होती. रसिकांच्या आग्रहाखातर संत चोखोबांचा ‘आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन’ हा अभंग त्यांनी सादर केला. गायनाबरोबरच अभंगाच्या आशयालाही रसिकांनी दाद दिली. ‘सब सखिया समजये’ ही भैरवी गाऊन पंडित यांनी मैफिलीची सांगता केली.