शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक धडकणार!

By admin | Updated: July 19, 2015 23:35 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : संपूर्ण राज्यात होणार एकाच दिवशी मोर्चा

वाटूळ : संचमान्यतेचे बदललेले निकष, वाढीव पदावरील मंजूर शिक्षकांना तत्काळ वेतन सुुरु करणे अशा महत्त्वाच्या मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने राज्यभरातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक २२ जुलै रोजी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.२० जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ जुलैपासून आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना महासंघातर्फे देण्यात आला आहे. संचमान्यतेच्या नव्या निकषामुळे ३ हजार अनुदानित तुकड्या कमी होऊन राज्यभरातील १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. २००३ ते २०११ पर्यंतच्या एक हजार वाढीव पदांना मंजूरी देण्याचा निर्णय शासनाने २ मार्च २०१४ रोजी घेतला. परंतु त्या शिक्षकांच्या वेतनाची कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याने या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षक आता आक्रमक झाले आहेत.गेल्या कित्येक वर्षापासून या प्रश्नांवर संघटना आंदोलने करीत असून, प्रत्येक वेळी शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले असल्याने यावेळी चार टप्प्यांमध्ये संघटनेने आंदोलन पुकारले असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश औताडे यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यामध्ये २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तद्नंतर २४ जुलै रोजी राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्यानंतर २८ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे जेल भरो आंदोलन तसेच शेवटच्या टप्प्यात लोकमान्य टिळक पु्ण्यतिथी दिनी १ आॅगस्ट रोजी प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. (वार्ताहर)५आॅनलाईन संचमान्यतेसंबंधित निकषांमुळे ज्युनिअर कॉलेजमध्ये सुमारे १० हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. तसेच संचमान्यतेच्या सॉफ्टवेअरच्या त्रुटींमुळे जेवढ्या तुकड्या कमी तेवढे शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. परिणामी संचमान्यता न झाल्यास नियमीत शिक्षकांचे पगारदेखील रखडणार आहेत. तसेच आणखी महत्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आंदोलनात सक्रिय सहभागी घ्या.- प्रा. प्रकाश औताडे,अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय संघटना, रत्नागिरी.