पत्रकार अनंत जाधव यांच्यासह सिंधू रक्तमित्रला पत्रकार प्रेरणा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 05:55 PM2022-12-16T17:55:21+5:302022-12-16T17:55:47+5:30

Sindhudurg: भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून यात महाराष्ट्रातून बारा पत्रकार व छायाचित्रकार यांची घोषणा करण्यात आली

Journalist Prerna Award to Sindhu Raktamita along with journalist Anant Jadhav | पत्रकार अनंत जाधव यांच्यासह सिंधू रक्तमित्रला पत्रकार प्रेरणा पुरस्कार

पत्रकार अनंत जाधव यांच्यासह सिंधू रक्तमित्रला पत्रकार प्रेरणा पुरस्कार

Next

सावंतवाडी : भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून यात महाराष्ट्रातून बारा पत्रकार व छायाचित्रकार यांची घोषणा करण्यात आली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पत्रकार अनंत जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच रक्तदान क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला हि प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील पत्रकार अधिवेशन कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या उपस्थितीत येत्या दि. २७ डिसेंबर रोजी वितरित केला जाणार आहे.

भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना म्हणून ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कल गेले अनेक वर्षे काम करत असून पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत ते आवाज उठवत असतात महाराष्ट्रातील अनेक पत्रकाराच्या समस्या मंत्रालयीन पातळीवर सोडवल्या असून या संघटनेचे दरवर्षी अधिवेशन होते.त्यात पत्रकार आपल्या समस्या मांडत असतात.

यावर्षी चे अधिवेशन २७ डिसेंबर ला कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनात ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त पत्रकारा बरोबर राज्यातील दोन सामाजिक संस्थाना गौरविण्यात येणार आहे यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा समावेश आहे.तसेच पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त अनंत जाधव यांना ही गौरविण्यात येणार आहे.
अनंत जाधव हे गेली वीस वर्षे विविध दैनिकातून आपली पत्रकारिता करीत असून, त्यांनी विविध विषयांवर लेखन केले असून त्याचा कोल्हापूर येथील अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, माहिती उपसंचालक संभाजी खराट, ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल चे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल तसेच केंद्रिय अध्यक्ष गणेश कोळी,कांचन जाबोटी,राजेश पाटील आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Journalist Prerna Award to Sindhu Raktamita along with journalist Anant Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.