शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Sindhudurg: महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ओरोस फाटा येथे जेल भरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:54 IST

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्यावतीने आयोजन

ओरोस : बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी बुधवारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या वतीने देशभर जेलभरो आंदोलन केले. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओरोस फाटा येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटना सिंधुदुर्गच्या वतीने जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी ताब्यात घेत समज देऊन सोडले.सम्राट अशोक यांनी बिहार बोधगया येथे महाबोधी महाविहार निर्माण केले आहे. भारत स्वातंत्र्यानंतर काश्मिरी ब्राह्मणाने या स्थळावर कब्जा करण्याची योजना बनविली. त्यामध्ये बोधगया येथील महाबोधी महाविहार हे स्थळ आहे. बोधगया येथे महंत ब्राह्मणांनी स्वार्थापोटी कायदा बनवून तेथे कब्जा केला आहे. महाबोधी महा विहार मंदिर कायदा १९४९ बनवून ब्राह्मणांना महाबोधी महाविहारचे मालक दाखविण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा व महाबोधी महाविहार मुक्त करावे यासाठी ईव्हीएमच्या विरोधात, बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ यासह अन्य मागण्यांसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या माध्यमातून देशव्यापी आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू असून, याचाच एक भाग म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सिंधुदुर्गचे पदाधिकारी यांनी आज ओरोस फाटा येथे जेलभरो आंदोलन केले. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले तसेच पोलिस ठाण्यात आणून समज देऊन त्यांना सोडण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBiharबिहारBuddha Cavesबौद्ध लेणीagitationआंदोलन