अवैध पर्ससीन, एलईडी मासेमारी बंद व्हावी--पारंपरिक  मच्छिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 05:46 PM2019-04-17T17:46:46+5:302019-04-17T17:47:50+5:30

जिल्ह्यात सुरू असलेली अवैध पर्ससीन मासेमारी व एलईडीद्वारे केली जाणारी मासेमारी बंद करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी देवगडमधील पारंपरिक मच्छिमारांनी

Invalid Persians, Led Fisheries - Traditional Fishermen | अवैध पर्ससीन, एलईडी मासेमारी बंद व्हावी--पारंपरिक  मच्छिमार

अवैध पर्ससीन, एलईडी मासेमारी बंद व्हावी--पारंपरिक  मच्छिमार

Next
ठळक मुद्देअन्यथा पारंपरिक मच्छिमारांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी समुद्रात उतरून उग्र आंदोलन छेडावे लागेल

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सुरू असलेली अवैध पर्ससीन मासेमारी व एलईडीद्वारे केली जाणारी मासेमारी बंद करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी देवगडमधील पारंपरिक मच्छिमारांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मच्छिमारांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ जून २०१६ रोजीच्या राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार १ जानेवारीपासून पर्ससीन मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी असताना ४५० मिनी पर्ससीन व ५०० पर्ससीन नौका राज्याचा जलधी क्षेत्रात बेकायदा मासेमारी करीत आहेत.

राज्य आणि केंद्र शासनाने सागरी पर्यावरणाचा नाश करणाºया घातक एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करण्यास बंदी घातलेली असताना शेकडो नौका एलईडी लाईटचा वापर करून मच्छिमारी करीत आहेत. 

५ फेब्रुवारी २०१६ रोजी पर्ससीन मासेमारीवर निर्बंध लागू झालेले असताना अवैध मिनी पर्ससीनद्वारे किनाºयालगत उथळ पाण्यात व खोल सागरात पर्ससीन नौका एलईडीद्वारे करीत असलेल्या अव्याहत मासेमारीमुळे सागरी जैवविविधतेचा नाश होत आहे. जिल्ह्यातील अन्य हजारो नौकांना खर्च भागेल एवढे मासे मिळत नसल्याने नौकामालक, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवन कसे जगावे हा प्रश्न पडला आहे.

सरकार जर कायद्याप्रमाणे कारवाई करीत नसेल तर मच्छिमारांकडे  असलेली संस्थाकर्जे, एनसीडीसी कर्ज, बँक कर्ज माफ करून मच्छिमार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी पेन्शन योजना लागू करावी. अन्यथा पारंपरिक मच्छिमारांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी समुद्रात उतरून उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मच्छिमारांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

यावेळी जगन्नाथ कोयंडे, दत्ताराम कोयंडे, उमेश खवळे, ज्ञानेश्वर खवळे, देविदास कुबल, महेंद्र चौघुले, महेश सागवेकर, पिंटू कोयंडे, राजा निकम, आबा बापर्डेकर, बाबू लोणे, कृष्णा ढोके, बाळा आचरेकर, संतोष कोयंडे, शंकर कुबल, सदानंद तारी, प्रमोद खवळे, अमोल जोशी, प्रदीप दरवेस आदी मच्छिमार उपस्थित होते.

मच्छिमारांची दिशाभूल

समुद्रात सुरू असलेल्या अवैध मासेमारीकडे सहाय्यक आयुक्त व संबंधित परवाना अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे हे अधिकारी कर्तव्यात कसूर करून ठोस कारवाई करण्याऐवजी खोटी व दिशाभूल करणारी कारणे सांगून अवैध मासेमारी बंद करीत नाहीत, अशी मच्छिमारांची ठाम भूमिका झाली आहे, असेही सांगण्यात आले.

देवगडच्या नायब तहसीलदार प्रिया परब यांची पारंपरिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन एलईडी आणि अवैध पर्ससीन मासेमारी बंद करण्याबाबतचे निवेदन त्यांना दिले. (वैभव केळकर)

Web Title: Invalid Persians, Led Fisheries - Traditional Fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.