Crime News: नशेत सख्या भावाचाच केला खून, कणकवली तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 11:26 IST2022-04-22T11:13:00+5:302022-04-22T11:26:05+5:30

नशेत दोघांमध्ये वादावादी झाली. यात प्रकाशने संतोषच्या डोक्यात लोखंडी फुकणी मारली. यामध्ये संतोष याचा जागीच मृत्यू झाला.

Intoxicated brother murdered in Kankavali taluka | Crime News: नशेत सख्या भावाचाच केला खून, कणकवली तालुक्यातील घटना

Crime News: नशेत सख्या भावाचाच केला खून, कणकवली तालुक्यातील घटना

संतोष पाटणकर

खारेपाटण : खारेपाटण जवळ असलेल्या कणकवली तालुक्यातील कूरंगवणे - गोसावीवाडी येथे दारूच्या नशेत सख्या भावानेच आपल्या भावाचा खून केला. संतोष तुकाराम गिरी (वय ५५) असे या मृताचे नाव आहे. या घटनेने कुरंगावणे-गोसावीवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना काल, गुरुवारी (दि-२१) घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुरंगवणे येथील रहिवासी असलेले संतोष गिरी आणि प्रकाश तुकाराम गिरी (वय६०) हे दोघे भाऊ स्वतंत्र राहतात.  दारुच्या नशेत या दोघांमध्ये वादावादी झाली. यात प्रकाशने संतोषच्या डोक्यात लोखंडी फुकणी मारली. यामध्ये संतोष याचा जागीच  मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात, रुपेश गुरव आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित प्रकाश गिरी याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. याबाबतची  फिर्याद सिताराम तुकाराम गिरी यांनी दिली असून अधिक तपास कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आज, शुक्रवारी सकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

Web Title: Intoxicated brother murdered in Kankavali taluka