तातडीने घरे पूर्ण करण्याच्या सभापतींनी दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 13:09 IST2020-11-23T13:05:17+5:302020-11-23T13:09:15+5:30
home, kankavli, sindhudurngnews आवास दिन कार्यक्रमानिमित्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी कणकवली तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना भेट दिली. तसेच लाभार्थ्यांची संबंधित घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्या. नवीन प्रस्ताव सादर करण्याबद्दलही अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी त्यांनी सूचित केले.

फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालय येथे आवास दिनानिमित्त वीस घरकुलांच्या लाभार्थ्यांना सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश देण्यात आले. यावेळी पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
कणकवली : आवास दिन कार्यक्रमानिमित्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी कणकवली तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना भेट दिली. तसेच लाभार्थ्यांची संबंधित घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्या. नवीन प्रस्ताव सादर करण्याबद्दलही अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी त्यांनी सूचित केले.
फोंडाघाट ग्रामपंचायत येथे आवास दिनानिमित्त एकाच दिवशी वीस घरकुलांच्या लाभार्थ्यांना सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश देण्यात आले. यावेळी माजी सभापती सुजाता हळदिवे, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, सरपंच संतोष आग्रे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत लाड, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, झोनल अधिकारी सुनील पांगम, सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद पालकर, ग्रामविकास अधिकारी चौलकर आदी उपस्थित होते.
घरकुले मंजूर करण्याचा प्रयत्न करणार
यावेळी पात्र लाभार्थ्यांची आढावा सभा घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या. तसेच कातकरी समाजातील १८ लाभार्थ्यांच्या वस्तीला भेट देण्यात आली. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन घरकुले मंजूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासनही तळेकर यांनी यावेळी दिले.