कणकवलीत पोलिसांकडून लॉजची तपासणी, महिला पोलीस पथकासह पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:02 IST2018-10-19T15:00:08+5:302018-10-19T15:02:13+5:30
कणकवली शहरातील लॉजची पोलिसांनी अचानक तपासणी केली. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी महिला पोलीस पथकासह शहरातील लॉजची पाहणी केली.

कणकवलीत पोलिसांकडून लॉजची तपासणी, महिला पोलीस पथकासह पाहणी
ठळक मुद्देकणकवलीत पोलिसांकडून लॉजची तपासणीमहिला पोलीस पथकासह केली पाहणी
सिंधुदुर्ग : कणकवली शहरातील लॉजची पोलिसांनी अचानक तपासणी केली. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी महिला पोलीस पथकासह शहरातील लॉजची पाहणी केली.
शहरातील काही लॉजवर अनैतिक धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.
कणकवली बसस्थानकासमोरील तसेच मुख्य चौकातील लॉजची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले.