शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव घरपट्टी विरोधात आंदोलन करणार

By admin | Updated: August 2, 2015 20:46 IST

कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा ठराव : जनतेसाठी बुरे दिन आणण्याचा निर्णय

कुडाळ : युती शासनाने घरपट्टी वाढीव करण्याचा निर्णय म्हणजे जनतेसाठी ‘अच्छे दिन’ नाही, तर ‘बुरे दिन’ आणणारा निर्णय आहे. वाढीव घरपट्टी आकारून जनतेवर अन्याय होणार असल्याने या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी पक्ष आंदोलन छेडणार, असा निर्णय कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या कै. शिवरामभाऊ जाधव सभागृहात तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, प्रदेश सरचिटणीस अमित सामंत, विधान सभा अध्यक्ष बाळ कनयाळकर, भास्कर परब, साबा पाटकर, नाझीर शेख, वसंत दळवी, प्रसाद राऊळ, महिला अध्यक्षा पूनम सावंत, राधिका परब, लालू पटेल, वैभव साटम, सचिन पाटकर, सावळाराम अणावकर, बाळा पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यासभेत वाढीव घरपट्टीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानुसार युती शासनाने मूल्याधारीत वाढीव घरपट्टी करण्याच्या निर्णयासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यापूर्वी घरपट्टी ही ग्रामीण शहर भागातील घरपट्टी क्षेत्रफळानुसार आकारली जात होती. आताच्या युती सरकारने घरपट्टीच्या निकषात बदल करून घरपट्टी वाढीव करण्याचा घाट घातला आहे. यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियमन २०१५ अशी अधिसूचना काढली आहे. यामुळे झोपडी किंवा मातीच्या घरासाठी सध्या जी घरपट्टी भरावी लागते, तिच्या दहापट घरपट्टी भरावी लागणार आहे. त्यामुळे या करवाढीने सामान्य जनता होरपळून निघणार आहे. या निर्णयासंदर्भात हरकती घेण्याकरिता शासनाने वेळ देणे आवश्यक असताना हरकतींसाठी ५ आॅगस्टपर्यंतचीच मुदत दिली आहे. सरकारने हरकती घेण्यासाठीचाही कालावधी अल्प दिल्याने याबाबत संपूर्ण ग्रामीण भागापर्यंत माहिती नाही. त्यामुळे या हरकती कागदावरच राहणार असून, शासन निर्णय मंजूर झाल्यास जनतेला मोठा हादरा बसणार आहे. युती शासनाने काढलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. याबाबत जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असून जनतेवर अन्याय होऊ देणार नाही, असा निर्णय या सभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)संघटनावाढीसाठी तालुक्यात कार्यक्रम कुडाळ तालुक्यात राष्ट्रवादी संघटनावाढीसाठी कुडाळ तालुक्याचे सर्व पदाधिकारी संपूर्ण कुडाळ तालुक्याचा दौरा करणार असून, त्यात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पक्षाचे मेळावे आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.