कणकवलीत पावसाचा जोर वाढला, नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 06:26 PM2020-06-18T18:26:46+5:302020-06-18T18:28:27+5:30

कणकवली तालुक्यात गेले चार दिवस पावसाने सातत्य ठेवले असून काही ठिकाणी घरांच्या पडझडीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पंच यादी घालण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.

Increased rainfall in Kankavali, increase in river water level | कणकवलीत पावसाचा जोर वाढला, नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

बिडवाडी हुंबरणे येथील रमेश चव्हाण यांच्या घराची पडवी कोसळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Next
ठळक मुद्देकणकवलीत पावसाचा जोर वाढला, घरे, गोठ्यांचे नुकसान नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

कणकवली : कणकवली तालुक्यात गेले चार दिवस पावसाने सातत्य ठेवले असून काही ठिकाणी घरांच्या पडझडीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पंच यादी घालण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.

जोरदार कोसळणाऱ्या पावसाबरोबरच अधूनमधून जोरदार वारे वाहत असतात. त्यामुळे घरे, गोठे, मांगर यांच्या छपरांवर झाडे तसेच फांद्या पडून नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. या पावसामुळे मंगळवारी बिडवाडी-हुंबरणे गावचे रमेश नारायण चव्हाण यांच्या राहत्या घराची पडवी कोसळून मोठे नुकसान झाले आहे .

तर तळेरे वाघाचीवाडी येथील विठोबा नारायण चव्हाण यांच्या घराच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पंच यादी घालण्याचे काम सुरू आहे. आणखीन काही ठिकाणी नुकसान झाले आहे.
 

Web Title: Increased rainfall in Kankavali, increase in river water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.