भरधाव डंपरची वीज खांबाला धडक, शिवडाव, कळसुली गावचा वीजपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:50 IST2021-03-11T18:48:26+5:302021-03-11T18:50:07+5:30
Accident Sindhudurg- भरधाव डंपरची विजेच्या खांबाला धडक बसून डंपर पलटी झाल्याची घटना शिवडाव धनगरवाडी हेळा स्टॉप येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शिवडाव आणि कळसुली गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता. डंपर क्रमांक ( एम एच ०७ एक्स २८२८ ) हा घेऊन चालक क्रशरच्या दिशेने जात होता.

शिवडाव येथे भरधाव डंपरची विजेच्या पोलला धडक बसून विजवाहक तारा तुटल्यामुळे नुकसान झाले आहे.
कणकवली : भरधाव डंपरची विजेच्या खांबाला धडक बसून डंपर पलटी झाल्याची घटना शिवडाव धनगरवाडी हेळा स्टॉप येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शिवडाव आणि कळसुली गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता. डंपर क्रमांक ( एम एच ०७ एक्स २८२८ ) हा घेऊन चालक क्रशरच्या दिशेने जात होता.
मात्र शिवडाव धनगरवाडी येथे चालकाचे नियंत्रण सुटून डंपरची वीज पोलला जोरदार धडक बसली. यात पोलला धडकून डंपर पलटी झाला. तर या अपघातात वीज वीतरणचा पोल वाकला आहे. तसेच विजवाहक तारा तुटल्यामुळे शिवडाव आणी कळसुली गावातील बहुतांश घरे अंधारात होती. दरम्यान अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. चालक मद्यप्राशन केलेला होता. अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.